मुंबई : रेल्वे प्रशासन आणि राज्य सरकारने लोकांना सुविधा न दिल्यामुळे एल्फिन्स्टन रोड स्थानकावरील पुलावर चेंगराचेंगरी होऊन २३ निष्पाप लोकांचा बळी गेला. त्यामुळे मनसेने प्रशासनाला जाग आणण्यासाठी ‘संताप मोर्चा’चे आयोजन केलेय. या मोर्चाला ठाणे, पुणे आणि नाशिकची ताकद लावण्यात आल्याची चर्चा आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकांना आवश्यक अणाऱ्या साध्या सोयी-सुविधा गोष्टीही हे सरकार देऊ शकणार नसेल तर सरकारचा उपयोग काय, असा सवाल करत महाराष्ट्र नवनिर्माण सेना चर्चगेट रेल्वे स्थानकावर आज मोर्चा काढणार आहे. या मोर्चात  सहभागी होण्याचं आव्हान मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केले आहे. त्यासाठी मनसेनं ठाणे, पुणे, नाशिकचीही ताकद लावली आहे.



हा ‘संताप मोर्चा’ आहे. हा मोर्चा माझा, माझ्या पक्षाचा नाही तर आपल्या सर्वाचा आहे, असे आवाहन करणारे पत्रकच राज यांनी प्रसिद्ध केले आहे. काही जण या मोर्चाकडे राजकारण म्हणून पाहतील. आज पुलावर चेंगरून माणसे मरण पावली. तशी ती मागे एटीएमच्या रांगेतही गेली. शेतकरी आत्महत्या करतोच आहे. आता तर फवारणीमुळेही शेतकरी मरत आहे. लोकांना बोलण्याची सोय नाही. सर्वत्र दहशतीचे वातावरण आहे. त्याविरुद्ध आवाज उठवलाच पाहिजे, असे आवाहन या पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.