मुंबई : मुंबईतल्या मेट्रो-३ प्रकल्पाच्या भुयारी मार्गाचं खोदकाम करणारं पहिलं टनेल बोरिंग मशीन, जमिनीच्या खाली उतरवण्यात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भुयार तयार करणाऱ्या या मशीनचा सुमारे ८० टन वजनाचा मुख्य भाग माहिममधल्या नयानगर भागात उतरवण्यात आला. भुयारी मार्ग बनवणाऱ्या टनेल बोरिंग मशीनचं पूर्ण वजन तब्बल सातशे टन इतकं आहे. 


मेट्रोसाठीचं हे दुसरं मशीन मुंबईत दाखल झालं असून एकंदर अशा १७ टनेल बोरिंग मशीनद्वारे मेट्रो-३ मार्गाचा भुयारी मार्ग तयार केला जाणार आहे. तर प्रत्यक्ष भुयारी मार्ग तयार करण्याच्या कामाला ऑक्टोबर महिन्यात सुरुवात होणार आहे.