Mhada Lottery 2023 : सर्वसामान्यांचे घर अशी ओळख असलेल्या म्हाडासंदर्भात मोठी बातमी. म्हाडाने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. (Mhada Deposit) म्हाडाने अल्प, अत्यल्प गटाच्या अनामत रकमेतील कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय म्हाडा प्राधिकरणानं घेतला आहे. मात्र मध्यम आणि उच्च उत्पन्न गटाची अनामत रक्कम वाढणार आहे. ही वाढ नेमकी किती असेल हे लवकरच जाहीर केलं जाईल. ही रक्कम एकूण घराच्या रकमेच्या एक टक्का किंवा त्यापेक्षा जास्त असेल अशी चर्चा आहे.  (Mumbai Mhada Lottery 2022 Deposit amount increase)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

(अधिक वाचा - Post Office ने आणली जबरदस्त योजना! एका वर्षात बँकेपेक्षा जास्त फायदा)


मुंबई म्हाडा लॉटरी 2022 (Mumbai MHADA Lottery 2022) ची वाट पाहत असताना म्हाडा एक मोठ्या निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. म्हाडाचे अर्ज भरण्यासाठी आपल्याला काही रक्कम  Deposit म्हणून द्यावी लागते. या Deposit रक्कमेसंदर्भात म्हाडाने आता महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. म्हाडाच्या घरांच्या सोडतीसाठीच्या अनामत (Deposit) रक्कमेत वाढ करण्याचा प्रस्ताव म्हाडाच्या विचाराधीन होता. मात्र, याबाबत थोडा बदल केला आहे. ही रक्कम सगळ्यांसाठी लागू केली जाणार नाही. केवळ आता मध्यम आणि उच्च उत्पन्न गटाची अनामत रक्कम वाढणार आहे. 


मुंबईत सध्या किती अनामत द्यावी लागते? 


मुंबईतील म्हाडाच्या घरांसाठी अर्जासोबत उत्पन्न गटाप्रमाणे जी रक्कम भरतो, ती किती आहे हे आपण आधी जाणून घेऊया. सध्या मुंबई-ठाण्याच्या सोडतीसाठी (Mumbai-Thane lottery) अत्यल्प गटासाठी 5,000 रुपये, अल्प गटासाठी 10,000 रुपये, मध्यम गटासाठी 15,000 रुपये आणि उच्च गटासाठी 20,000 रुपये अशी अनामत रक्कम आहे. या अनामत रक्कमेनुसारच मुंबई मंडळाची शेवटची 2019 ची सोडत काढण्यात आली होती.


म्हाडाच्या नवीन निर्णयानुसार किती रक्कम असणार?


मुंबई मंडळातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये घराच्या एकूण रक्कमेच्या 5 ते 10 टक्के रक्कम अनामत रक्कम म्हणून घेण्याचा विचार करत करण्यात आला होता. मात्र, या निर्णयात बदल करताना म्हाडाने अल्प, अत्यल्प गटाच्या अनामत रकमेतील कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय म्हाडा प्राधिकरणानं घेतला आहे. मात्र मध्यम आणि उच्च उत्पन्न गटाची अनामत रक्कम वाढणार आहे. 


सर्वसामान्यांना मोठा दिलासा


म्हाडाच्या घरांसाठी मोठ्या संख्येने अर्ज येत असतात, त्यामुळे म्हाडामध्ये घर घेण्यासाठी स्पर्धा वाढत आहे. दरम्यान, मध्यंतरी Deposit रक्कम वाढविण्यावर भर देण्यात आला होता. आत म्हाडाने अल्प, अत्यल्प गटाच्या अनामत रकमेतील कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय म्हाडा प्राधिकरणानं घेतला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. तर मध्यम आणि उच्च उत्पन्न गटाची अनामत रक्कम वाढणार आहे. म्हाडाकडून Deposit रक्कम वाढविण्याचा विचार सुरु आहे. ही रक्कम वाढल्यास मध्यम वर्गाची मोठी अडचण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निर्णयावर मध्यम वर्गाकडून नाराजी व्यक्त होण्याची शक्यता आहे.