म्हाडाच्या 8 हजार 984 घरांची आज सोडत, कोणाला लागणार लॉटरी?
MHADA lottery 2021 : म्हाडाच्या (MHADA ) 8 हजार 984 घरांची आज सोडत काढण्यात येणार आहे.
मुंबई : MHADA lottery 2021 : म्हाडाच्या (MHADA ) 8 हजार 984 घरांची आज सोडत काढण्यात येणार आहे. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात सोडतीचा कार्यक्रम सकाळी 10 वाजता होणार आहे. कोरोनामुळे निवडक अर्जदारांनाचसोडतीच्या ठिकाणी प्रवेश देण्यात येणार आहे. (Mhada Leaving houses lottery today for over 8,000 houses)
म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाकडून तब्बल 8 हजार 205 घरांच्या सोडतीची घोषणा करण्यात आली. यांपैकी 97 टक्के घरे ही अल्प आणि अत्यल्प उत्पन्न असलेल्या गटांसाठी आहेत. सर्वसामान्यांचे स्वप्न आज साकार होणार आहे. कोणाल लॉटरी लागते याची उत्सुकता आहे. थेट Live14 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 10:00 वाजता सुरू होईल. येथे थेट निकाल पाहू शकता. (क्लिक करा) (Live webcast begins at 10:00am on 14th Oct 2021) तसेच https://www.mhada.gov.in/en या संकेतस्थळावर तुम्हाला निकाल पाहता येणार आहे.
कोकणातील या लॉटरीच्या माध्यमातून अत्यल्प उत्पन्न गटासाठी 70 टक्के घरे, अल्प उत्पन्न गटासाठी 27 टक्के घरे उपलब्ध होणार असल्याची माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. म्हणजेच एकूण 97 टक्के घरे ही अल्प आणि अत्यल्प गटांसाठी उपलब्ध असणार आहेत.