MHADA lottery 2024: म्हाडा मुंबई मंडळाने अखेर 2024साठी लॉटरी जाहिर केली आहे. मुंबईत हक्काच्या घरांचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी हा मोठा दिलासा आहे. मुंबईत पवई, विक्रोळी आणि गोरेगाव येथे ही म्हाडाची घरे आहेत. 2030 घरांसाठी शुक्रवारी म्हाडाने लॉटरी जाहीर केली आहे. तर,13 सप्टेंबर रोजी या घरांची सोडत जाहीर केली जाणार आहे. मात्र, म्हाडाने यंदा जाहीर करण्यात आलेल्या घरांच्या किंमती मात्र करोडोंच्या घरात आहे. त्यामुळं सर्वसामान्यांमध्ये नाराजी पसरली आहे. उच्च गटासाठी म्हाडाच्या घरांच्या किंमती सर्वाधिक आहेत. तर, अल्प व अत्यल्प गटासाठी घरं कमी आहेत. कुठे आहेत ही घरे आणि त्याची किंमत किती असेल जाणून घ्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई मंडळाच्या 2030 घरांच्या सोडतीसाठी शुक्रवारपासून अर्ज विक्री-स्वीकृती प्रक्रिया सुरू झाली आहे. 4 सप्टेंबरपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार असून 13 सप्टेंबर रोजी सोडतीचा निकाल आहे. अल्प, अत्यल्प, मध्यम आणि उच्च गटासाठी यंदा घरे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. या घरांच्या किंमती 29 लाखांपासून ते सात कोटींपर्यंतच्या घरात आहेत. मुंबईतील कोणत्या भागात व किंमत किती असणार हे जाणून घ्या. 


मुंबईतील कोणत्या भागात आहेत घरे?


ताडदेव येथील किसेंट टॉवरमध्ये उच्च गटासाठी दोन घरे आहेत. 141 चौमी क्षेत्रफळाच्या घराची किंमत 7 कोटी 52 लाख हजार 631 इतकी आहे. तर, 142 चौमी क्षेत्रफळाच्या घराची किंमत 7 कोटी 57 लाख 94 हजार 268 रुपये इतकी आहे. ही 3 घरे आहेत. 


यंदाच्या म्हाडाच्या लॉटरीत विविध उत्पन्नाच्या घरांचा समावेश करण्यात आला आहे. यात विक्रोळी, कुर्ला, बोरिवली, अंधेरी, सांताक्रुझ, मुलुंड, चेंबूर, ओशिवरा, करीरोड, वडाळा, लोअर परेल, माझगाव, भायखळा, दादर, माहिम, घाटकोपर, मानखुर्द आणि कांदिवली या लोकेशनवर ही घरे उपलब्ध आहेत. 


घरांच्या किंमती किती असतील?


- अॅन्टॉप हिल येथे अत्यल्प गटासाठी 87 घरे- किंमत 51 लाख 41 हजार रुपये


- विक्रोळी (पॉकेट 2) अल्प गट 88 घरे- किंमत 67 लाख 13 हजार रुपये 


- विक्रोळी (पॉकेट १) अल्प गट 86 घरे- किंमत 50 लाख 31 हजार


- मालाड अल्पगटासाठीच्या 58 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या घरांची किंमत 70 लाख 87 हजार तर, 59 चौरस मीटर घराची किंमत 86 लाख 11 हजार आहे. 


- गोरेगाव मध्यम गट घराची किंमत 1 कोटी 11 लाख 94 हजार 755 रुपये.


- पवई मध्यम गट घराची किंमत 1 कोटी 20 लाख 13 हजार 


- पवई उच्च गट घराची किंमत 1 कोटी 78 लाख 71 हजार 650 रुपये


- गोरेगाव उच्च गटासाठी घरांची किंमत 1 कोटी 33 लाख 71 हजार आहे.