Mhada Lottery Mumbai : ( job) नोकरीधंदा सुरु करण्याच्या क्षणापासून अनेकजण एक स्वप्न नक्कीच पाहतात. ते स्वप्न म्हणजे एका सुरेख घराचं. आयुष्याच्या ठराविक टप्प्यावर आल्यानंतर, प्रपंच सुरु झाल्यानंतर आपल्या कुटुंबाला, मुलाबाळांना चांगल्या सुविधा आणि चांगलं घर देण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते. यासाठी सुरु होतो जीवाचा आटापिटा, प्रचंड मेहनत आणि मनाजोग्या घराचा शोध. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही काळापासून (Mumbai job opportunities) मुंबईत नोकरीच्या संधींची उपलब्धता पाहता या शहरात किंवा शहरापासून जवळच असणाऱ्या भागात घर घेण्यासाठी अनेकांनीच प्राधान्य देताना दिसलं. काही मंडळी तर, अद्यापही मुंबईत हक्काचं घर हवं, यासाठी प्रतीक्षा करताना दिसत आहेत. अशा सर्वच मंडळींसाठी ही मोठी बातमी. कारण, आता तुमच्या हक्क्याच्या घराच्या स्वप्नाला भरारी मिळणार आहे ते म्हणजे म्हाडाच्या नव्या सोडतीमुळे. 


हेसुद्धा वाचा : महाराष्ट्रात Monsoon चं आगमन नेमकं कधी? ऊन- पावसाची धरपकड सुरुच 


म्हाडाकडून मुंबई (Mhada Mumbai) मंडळाच्या घरांबाबतची माहिती अखेर सर्वांनाच देण्यात आलीये. मुंबईतील एकदोन नव्हे, तब्बल  4083 घरांसाठी सोमवारी (22 मे 2024) जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. साधारण वर्षभरापासून मुंबई मंडळाच्या सोडतीची चर्चा सुरू होती खरी, पण बऱ्याच कारणांमुळे ती लांबणीवर पडत गेली. पण, आता मात्र असं पुन्हा होणार नाही. कारण, अखेर म्हाडाच्या मुंबईतील घरांच्या जाहिरातीची प्रतीक्षा संपली आहे. अवघ्या काही दिवसांनी म्हणजेच 18 जुलै 2023 रोजी म्हाडाच्या घरांसाठी सोडत काढण्यात येणार आहे. मुंबईच्या पहाडी गोरेगाव, विक्रोळ कन्नमवार नगर, अॅन्टॉप हिल, बोरिवली, मालाड, दादर परिसरात ही म्हाडाची घरं असणार आहेत. 


महत्वाच्या तारखा 


सोडतीची जाहिरात - 22 मे 2023 
अर्जविक्री आणि अर्ज स्वीकृती - 22 मे 2023 (दुपारी 3 वाजल्यापासून )
अर्जस्वीकृतीची अखेरची तारीख (ऑनलाईन अनामत रक्कम भरून)- 26 जून रात्री 11.59 मिनिटांपर्यंत 
अर्जस्वीकृतीची अखेरची तारीख (NEFT, RTGS नं अनामत रक्कम भरून) - 28 जून (बँकांच्या कार्यालयीन वेळांमध्ये)
अर्जांच्या यादीची प्रसिद्धी - 4 जुलै 2023 दुपारी 3 वाजल्यानंतर 
सोडतीची तारीख - 18 जुलै सकाळी 11 वाजता


सोडतीतील घरं आणि अनामत रक्कम 


एकूण घरं - 4083
अत्यल्प गटासाठीची घरं- 2790  
अल्प गटासाठीची घरं - 1034
मध्यम गटासाठी घरं - 139
उच्च गटासाठी घरं - 120


अनामत रक्कम रुपये 590 अर्जशुल्कासह खालीलप्रमाणे 


अत्यल्प गट - 25590 रुपये 
पीएमएवाय अत्यल्प गट - 10590 रुपये 
अल्प गट - 50590 रुपये 
मध्यम गट - 1 लाख 590 रुपये 
उच्च गट - 1,50,590 रुपये