Mumbai Mhada : म्हाडा वसाहतींची चर्चा एरव्ही घरांच्या योजना किंवा सोडतीसाठी सुरु असते. पण, याच म्हाडाच्या वसाहतीमध्ये सुरु असणारा धक्कादायक प्रकार समोर आला आणि अनेकांच्याच पायाखालची जमीन सरकली. विरार येथील म्हाडाच्या एका वसाहतीमध्ये सेक्स रॅकेट सुरु असल्याचा सुगावा यंत्रणांना लागला. ज्यानंतर नालासोपारा अनैकिक मानवी वाहतूक शाखेच्या पोलिसांनी या सेक्स रॅकेटचा भांडाफोड करत एकावर अटकेची कारवाई केली. उपलब्ध माहितीनुसार यामध्ये दोन 23 वर्षीय बांगलादेशी मुलींसह एका अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली. 


हेसुद्धा वाचा : विदर्भासह मुंबईही गारठणार; हवामानानं धरली वेगळी वाट, पाहा Weather Update 


कुठे घडला हा धक्कादायक प्रकार? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अटक करण्यात आलेला आरोपी बांगलादेशी असून, त्याच्या दोन साथीदारांना मात्र पळ काढण्यात यश मिळालं. ज्यामुळं आता त्यांचाही शोध पोलीस यंत्रणा घेत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार विरार पश्चिमेला असणाऱ्या म्हाडाच्या एका मोठ्या वसाहतीत हा प्रकार सुरु होता. 


विरारच्या म्हाडा वसाहतीच्या डी - 7 इमारतीतील खेली क्रमांक 2104 मध्ये सेक्स रॅकेट सुरु असल्याची माहिती यंत्रणांना मिळाली होती. जिथं आरोपी अशोक दास (54) त्याच्या साथीदारांच्या मदतीनं बांगलादेशातून बेकायदेशीररित्या अल्पवयीन मुलींची फसवणूक करून त्यांना देहव्यापारासाठी मुंबईत आणत होता. विरारमधील याट फ्लॅटमध्ये तो या मुलींना ठेवून त्यानंतर ते त्यांना ग्रँट रोड परिसरातील रेड लाईट भागामध्ये पाठवत होता असं तपासातून उघड झालं आहे. 


अनैतिक वाहतूक शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार गेल्या दोन वर्षांमध्ये आरोपीनं तब्बल 300 हून अधिक मुलींची फसवणूक करत त्यांना मुंबईत आणलं होतं. सदर प्रकरणी अर्नाळा पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.