Mumbai MHADA Lottery 2023 : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांच्या सोडतीची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली आहे. मुंबईतील 4 हजार 83 घरांसाठी येत्या सोमवारी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर 18 जुलै रोजी सोडत काढण्यात येईल. वर्षभरापासून मुंबई मंडळाच्या सोडतीची चर्चा सुरु होती. मात्र अनेक कारणांमुळे ती लांबणीवर पडत गेली. अखेर आता मंडळानं 4 हजार 83 घरांच्या सोडतीच्या जाहिरातीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. पहाडी गोरेगाव, विक्रोळीतील कन्नमवार नगर, अन्टॉप हिल, बोरिवली, मालाड, दादर परिसरात ही म्हाडाची घरं असणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील  घरांच्या सोडतीची प्रतीक्षा संपली असून 4083 घरांसाठी 22 मे रोजी जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. एकूण घरे 4083 असणार आहेत. यात अत्यल्प - 2788,  मध्यम- 132,  उच्च - 38,  विखुरलेली - 102 अशी घरे असणार आहेत. जाहिरात 22 मे रोजी प्रसिद्ध होणार आहे. त्याच दिवसापासून नोंदणी करता येणार आहे.  अनामत रक्कमेसह अर्ज भरण्याची अंतिम तारीख 26 जून आहे. तर  सोडतीचे ठिकाण रंगशारदा, वांद्रे, पश्चिम आहे. घरांची सोडत 18 जुलै 2023 रोजी काढण्यात येणार आहे.


अर्ज भरण्याची अंतिम मुदत ही 26 जून रोजी संपणार आहे. त्यानंतर स्वीकृती अर्जांची छाननी करण्यात येणार  आहे. त्यानंतर पात्र अर्जदारांची यादी जाहीर केली जाईल. 18 जुलै रोजी सोडत काढण्यात येणार आहे. अल्प गटासाठी गोरेगाव येथे घरे आहेत. अल्प गटातील घरांच्या किमती साधारण 30 ते 40 रुपयांपर्यंत आहेत. तर पहाडी भागातील घरांची किंमत साधारण  30 ते 44 लाखांच्या घरात असण्याची शक्यता आहे.


मध्यम गटासाठी 132 घरे असून ही घरे दादर, टिळक नगर (चेंबूर), सहकार नगर (चेंबूर) कांदिवली येथील आहेत. तसेच उच्च गटासाठी 39 घरे असून ही घरे ताडदेव, लोअर परळ, शीव (सायन), शिंपोली, तुंगा पवई येथे आहेत.