मुंबई : म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या मुंबईतील विविध गृहप्रकल्पांतील 1 हजार 384 सदनिकांची आज सोडत आहे.. या सदनिकांसाठी विक्रमी म्हणजे १ लाख ६४ हजार अर्ज प्राप्त झालेत. वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवनाच्या प्रांगणात सकाळी १० वाजता या अर्जांची संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे. गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांच्या अध्यक्षतेखाली  होणा-या प्रशस्त कार्यक्रमात म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांच्या हस्ते सोडत काढण्यात येणार आहे. यासाठी ५ नोव्हेंबरपासून ऑनलाईन नोंदणी करता येत होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


म्हाडाच्या अत्यल्प प्रवर्गासाठी घराची किंमत २० लाख रुपये किंमत आहे. तर अल्प उत्पन्न गटासाठी २० लाख ते ३५ लाख, मध्यम उत्पन्न गटासाठी ३५ लाख ते ६० लाख आणि उच्च उत्पन्न असलेल्यांसाठी घराची किंमत ६० लाखांपेक्षा जास्त आहे. म्हाडाचे सर्वात कमी किंमतीचे घर १४ लाख ६२ हजारापर्यंत आहे. तर उच्च उत्पन्न गटातील धवलगिरी कंबाला हिल येथील घराची किंमत सर्वाधिक ५ कोटी ८० लाखांच्या घरात आहे.


निकाल पाहण्यासाठी  : https://mhada.gov.in/en/mumbai-board-lottery-2018-results


घरांसाठी उत्पन्नाची मर्यादा 



- अत्यल्प प्रवर्ग उत्पन्न मर्यादा : २५००० 


- अल्प उत्पन्न - २५ ते ५० हजार 


- मध्यम उत्पन्न - ५० ते ७५ हजार प्रति महिना


इथे पाहा प्रक्षेपण 



 म्हाडाच्या संकेतस्थळावरून वेबकास्टींगद्वारे या सोडतीचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या सोडतीच्या कार्यक्रमाचं घरबसल्या थेट प्रक्षेपण पाहण्याकरीता http://mhada.ucast.in या संकेतस्थळावर लॉग इन करावं लागणार आहे.