मुंबई : मुंबईतल्या रस्त्यात पडणा-या खड्ड्यांना आता चक्क मिडास टच मिळणार आहे. रस्त्यात वारंवार पडणारे खड्डे बुजवण्यासाठी मुंबई महापालिका देशी कोल्ड मिक्सचा वापर करायची. पण आता चक्क विदेशी तंत्रज्ञानाची मदत घ्यायचं ठरवलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खड्डे बुजवण्यासाठी ऑस्ट्रियामध्ये मिडास टच, तर इस्रायलमध्ये स्मार्ट फील मटेरियलचा वापर होतो. तेच साहित्य आता मुंबई महापालिका देखील वापरणाराय. दोन दिवसांपूर्वी महापालिका मुख्यालयासमोर कसे खड्डे पडलेत, हे झी 24 तासनं दाखवलं होतं. 


बीएमसीच्या ए वॉर्ड विभागानं ते खड्डे मिडास टचनं बुजवलेत. 130 रुपये किलो असा या मिडास टचचा दर असून पालिकेसमोरील दोन खड्डे भरण्यासाठी 168 किलो मटेरियल वापरण्यात आलं. 


म्हणजेच दोन खड्डे बुजवण्यासाठी तब्बल 22 हजार रुपये खर्च झाले. त्यामुळं हे मिडास टच प्रकरण भलतंच महागडं ठरणार असून, मूळ रोगापेक्षा इलाज भयंकर असं म्हणण्याची वेळ येणाराय.