मुंबई : मिलिंद देवरा यांची छाननी समितीच्या बैठकीला दांडी मारली. त्यामुळे आता मिलिंद देवरा यांची नाराजीही दिसून आली आहे.  उर्मिला मातोंडकर यांनी उत्तर मुंबईतून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तेव्हा मी मुंबई काँग्रस अध्यक्ष या नात्याने त्यांना पूर्ण पाठिंबा दिला. मात्र त्यांना ज्यांनी पक्षात आणले त्याच लोकांनी वाऱ्यावर सोडल्यानंतर मी त्यांच्यामागे उभा राहिल्याचे देवरांनी सांगितले. उत्तर मुंबईतील नेत्यांना जबाबदार धरलं पाहिजे या त्यांच्या बाबीशी मी पूर्ण सहमत असल्याचे देवरा म्हणाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उर्मिला मातोंडकर यांच्या राजीनाम्यानंतर मिलिंद देवरा यांची अप्रत्यक्षरीत्या संजय निरुपम आणि त्यांच्या समर्थकांवर टीका केली आहे. उर्मिलाच्या खांद्यावरून निरुपमवर मिलिंद देवरा यांनी निशाणा साधला आहे. 



दोन मोठे धक्के 


मुंबई काँग्रेसला आज दोन मोठे धक्के बसले आहेत. उर्मिला यांना काँग्रेसमध्ये येऊन जेमतेम सहा महिने झाले होते. त्यांनी मिलिंद देवरांना लिहिलेलं पत्र सार्वजनिक करण्यात आले. त्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. या पत्रामध्ये उर्मिला यांनी संजय निरुपम यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती. त्याबाबत कोणतीही कारवाई न झाल्याने नाराज झालेल्या उर्मिला यांनी राजीनामा दिला. 


उर्मिला मातोंडकरांपाठोपाठ मुंबईतले उत्तर भारतीय काँग्रेस नेते आणि माजी मंत्री कृपाशंकर सिंह यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींना त्यांनी आपला राजीनामा पाठवल्याची माहिती आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत काँग्रेसच्या छाननी समितीची बैठकीत काश्मीरसंदर्भात काँग्रेसच्या भूमिकेबाबत कृपाशंकर यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आणि बाहेर आल्यानंतर थेट राजीनामाच सोपवला. कृपाशंकर हे मुंबई काँग्रेसचा उत्तर भारतीय चेहरा होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता त्यांच्या भाजपा प्रवेशाकडे लक्ष लागले आहे.