मुंबई : मेट्रीमोनी साइटवर जर आपण तुम्ही योग्य पार्टनर शोधयच्या प्रयत्नात असाल तर थोडं थांबा...कदाचित ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण मॅट्रोमॉनी साइटवरून झालेली ओळख पवईत राहणाऱ्या इसमाला आयुष्यभर लक्षात राहणारी ठरली. आयुष्याच्या साथी शोधायला गेलेल्या या इसमाला महिलेने लाखोंचा गंडा घातलायं. जीवनसाथी डॉट कॉम वर महीलेने आपली प्रोफाईल तयार केली होती.


२३ लाख रुपये उकळले


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या साईटवर तिची पवईतीलच एका इसमाशी ओळख झाली. कालांतराने दोघांमध्ये संभाषण वाढत गेलं.


काही दिवसांनी या महीलेने त्या इसमाकडे घरगुती अडचण असल्याचं सांगत काही रक्कम घेतली.


एवढंच नव्हे तर  एक आयफोन त्याच्याकडून गिफ्ट घेतला. ही अशी सगळी रक्कम मिळुन २३ लाख रुपये उकऴले.


महिला फरार 


प्रत्यक्ष भेटीनंतर इसमाला तिच्या प्रोफाईल वरील चेहरा आणी भेटलेली महीला वेगऴी असल्यचं समजलं.


आपली फसवणूक झाल्याचं कऴताच त्याने पवई पोलीस ठाणे गाठुन महिलेविरोधात तक्रार दाखल केली.


सध्या ही महिला फरार असून ब पवई पोलीसांनी या महीलेविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.