Girish Mahajan On Amit Thackeray: रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी इथे घडलेल्या भीषण दरड दुर्घटनेत आत्तापर्यंत 26 लोकांचे जीव गेल्याची माहिती मिळाली आहे. सध्या बचावकार्य सुरू असून शंभरहून अधिक लोक दगावल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशातच आता उरल्या सुरल्या विरोधकांनी राज्य सरकारवर टीका करण्यास सुरूवात केली आहे. या दुर्घटनेनंतर मनसे विद्यार्थी सेनेचे प्रमुख अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं. त्यावर आता ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) प्रत्युत्तर दिलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्य सरकार आमदार फोडण्यात व्यस्त नसते तर इर्शाळवाडी ची घटना
इर्शाळवाडीची घटना घटली नसती, अशी टीका मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी राज्य सरकारवर केली होती. मात्र, इर्शाळवाडी हे गाव कुठंही धोक्याच्या यादीत नव्हतं सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे मोठ्या दरडी कोसळून त्या गावावर हे संकट आलं. इर्शाळवाडीची घटना अचानक घडलेली असून हा निसर्गाचा कोप आहे ये सोपी गोष्ट अमित ठाकरे यांना समजू नये का? असा प्रश्न उपस्थित करत, अमित ठाकरे यांनी इतक्या बालिशपणाचे स्टेटमेंट करू नये, असा टोला गिरीश महाजन यांनी अमित ठाकरे यांना लगावला आहे.


अमित ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?


इर्शाळवाडीच्या घटनेबाबत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अगोदरच सर्वांना माहिती दिली होती आणि सतर्क केलं होतं, तसेच सरकारला उपाययोजना करण्यास सांगितलं होतं. मात्र, राज्य सरकार आमदार फोडण्यात व्यस्त असल्यामुळं त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं, अशी टीका अमित ठाकरे यांनी केली होती. सरकारने लक्ष न दिल्याने मोठी दुर्घटना घटना घडली आणि अनेक लोकांना आपले जीव गमवावे लागले, असं  मनसे विद्यार्थी सेनेच्या प्रमुखांनी म्हटलं होतं. त्यावर आता ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी पलटवार केला आहे.


आणखी वाचा - Khalapur Irshalwadi Landslide : इर्शाळवाडीत काळाचा घाला, रात्री नेमकं काय झालं? उदय सामंत यांनी दिली माहिती


दरम्यान, आत्तापर्यंत 26 जणांचे मृतदेह बचाव पथकाच्या हाती असून ही संख्या तीन आकडी असू शकते, अशी भीती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनं यांनी व्यक्त केली आहे. इर्शाळवाडीत 250 कुटुंब राहत असल्याची माहिती आहे, पण यांपैकी सुमारे 125 लोकांना आत्तापर्यंत बाहेर काढण्यात यश आलं आहे. त्यामुळे आता बचावकार्याला वेग आल्याचं दिसून येतंय.