Nawab Malik Ed Custody Extended | नवाब मलिकांना दिलासा नाहीच,7 मार्चपर्यंत ईडी कोठडीत
मनी लॉन्ड्रींग प्रकरणात राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक ईडी कोठडीत
मुंबई : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना ईडीने (ED) मनी लाँड्रिंग (Money Laundring) प्रकरणात अटक केली आहे. 3 मार्चपर्यंत ते ईडी कोठडीत (ED Custody) आहेत. त्यांची ईडी कोठडीची मुदत आज संपली. त्यामुळे आज त्यांना पीएमएलए कोर्टात (PMLA Court) हजर करण्यात आलं. कोर्टाने सोमवारपर्यंत म्हणजे सात मार्चपर्यंत ईडी कोठडीत वाढ केली आहे. (minority minister and ncp senior leader nawab malik get ed custudy till 7 march in money laundering cases )
ईडी कोठडीत असताना मलिक यांची प्रकृती अचानक बिघडली होती. त्यांना मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलं. २८ फेब्रुवारी रोजी त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आलं होते. त्यानंतर त्यांना पुन्हा ईडीच्या कार्यालयात आणण्यात आलं.
ईडीच्या वकिलांचा कोर्टात युक्तीवाद
पीएमएलए कोर्टात युक्तीवाद करताना ईडीने ६ दिवसांची कोठडीची मागणी केली. ईडीतर्फे अॅड. अनिल सिंग यांनी युक्तीवाद केला. ईडीच्या कोठडीत असताना काय झालं याची माहिती ईडीने कोर्टाला दिली. नवाब मलिक रुग्णालयात दाखल असल्याने चौकशी करता आली नाही, त्यामुळे आणखी ६ दिवसांच्या कोठडीची मागणी ईडीतर्फे करण्यात आली.
आरोपी सरदार शहवली खान याने दिलेल्या जबाबातील तपशील पाहता नवाब मलिक यांची अधिक चौकशी करायची आहे. त्याचबरोबर या प्रकरणात आम्ही आणखी काहींचे जबाब नोंदवले आहेत यामुळे कोठडी मिळावी, या प्रकरणात अधिक माहिती समोर येत आहे, आधीच्या रिमांड ॲप्लिकेशन मध्ये वेगवेगळे transaction नमूद आहेत. हसिना पारकरचं स्टेटमेंट, जेलमध्ये असलेल्या दोशीचं स्टेटमेंट, मालकीण असलेली मुनिराचं स्टेटमेंट आहे, या संदर्भात मलिक यांची चौकशी करायची आहे, असं अॅड. अनिल सिंग यांनी कोर्टात म्हटलं.
नवाब मलिक यांच्या वकिलांचा युक्तीवाद
55 लाख हसीना पारकरला दिल्याचा दावा करण्यात आला, टेरर फंडिंगचा आरोप केला, आता मात्र ईडी सांगत आहे की टाईप करताना चूक झाली आहे, आज रिमांडमध्ये 5 लाख म्हणत आहेत, ईडीच्या चुकीमुळे मलिक यांना ईडी कोठडीत इतके दिवस काढावा लागले, ईडीने नीट गृहपाठ करावा असा युक्तिवाद नवाब मलिक यांचे वकिल अॅड अमित देसाई यांनी केला.
चौकशीबाबत गुप्त ठेवण गरज आहे,मात्र आज पेपरमध्ये या प्रकरणाबाबत बातमी आली आहे, मलिक एक कॅबिनेट मंत्री आहेत म्हणून ते पुराव्याशी छेडछाड करतील असं ईडी सांगत आहे, मात्र या प्रकरणातील माहिती कोर्टाच्या आधी मीडियात येत आहे, तपास यंत्रणा आम्ही काही माहिती मागितली की आम्हाला गोपनीयतेचे नियम सांगतात, आजच प्रसार माध्यमातून आणि काही वृत्त पत्रातून केलेल्या तपासाची माहिती लीक केली गेली असं अॅड अमित देसाई यांनी म्हटलं.
कृपया मलिक यांना बाहेर सोडा, ते पुराव्यांशी छेडछाड करणार नाहीत, मात्र चौकशीबाबतची माहिती गुप्त ठेवा अशी विनंती अॅड. अमित देसाई यांनी केली. 25 वर्षांनंतर कोणी उठतं शत्रुत्व काढण्यासाठी आरोप करतं, या प्रकरणात अंडरवर्ल्डशी निगडित लोकांच्या विधानावर ईडीचा विश्वास बसतो, या केसमध्ये अचानक गुन्हेगारी जगतातील 25 वर्षांनी व्यक्ती विश्वासार्ह बनली आहे, असं मुद्दा अॅड. अमित देसाई यांनी उपस्थित केला.
ईडीच्या हाती नवी माहिती
दरम्यान, बीकेसी इथं नवाब मलिक यांच्याशी संबंधित आणखी एक मालमत्ता असल्याची माहिती ईडीच्या हाती लागली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा भूखंड २०० कोटी रुपये किंमतीचा आहे. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नवाब मलिक यांचा मुलगा फराज यांची टचवूड रिअल इस्टेट या कंपनीत २५ टक्के भागिदार आहे.