मिरा-भाईंदर महापालिकेत शिवसैनिकांचा राडा
मिरा भाईंदर महापालिकेत आज प्रचंड गोंधळ झाला.
मिरा-भाईंदर : मिरा भाईंदर महापालिकेत आज प्रचंड गोंधळ झाला. बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने कलादालन उभारण्यात मिरा भाईंदरचे सत्ताधारी भाजपा टाळाटाळ करत असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला. या आरोपावरून स्थायी समिती सभापती आणि महापौरांच्या दालनात शिवसैनिकांनी तोडफोड केली. राज्यात युती झाली तरी मिरा भाईंदर मध्ये युती होणार नाही, अशी घोषणा शिवसैनिकांनी यावेळी दिल्या. विद्यमान भाजपा आमदाराविरोधात प्रचंड शिविगाळ यावेळी करण्यात आली.
मिरा-भाईंदर महापालिकेच्या बैठकीत बाळासाहेब ठाकरेंच्या कलादालनाच्या विषयाचा समावेश न केल्यामुळे शिवसैनिक संतप्त झाले आणि त्यांनी महापौर कार्यालय आणि स्थायी समिती कार्यालयाची तोडफोड केली.
मिरा-भाईंदरमध्ये भाजपचे ६१ तर शिवसेनेचे २२ नगरसेवक आहेत. शिवसेनेच्या नगरसेवकांकडून बाळासाहेब ठाकरेंच्या कलादालनाचा विषय घेतला जात होता, पण या विषयावर टाळाटाळ होत असल्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले. दरम्यान याप्रकरणी भाजप, महापौर आणि स्थायी समिती सभापती यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.