Mira Raod Murder Case : मीरा रोड येथे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या महिलेच्या हत्याप्रकरणात आता नवा खुलासा झाला आहे. मीरा रोडच्या गीतनगर भागातील गीता दिप या इमारतीच्या 7 व्या मजल्यावर राहणाऱ्या मनोज साने (56) याने सरस्वती वैद्यची (32) अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याचे समोर आले आहे. आरोपी मनोज साने याने सरस्वती वैद्यच्या मृतदेहाचे असंख्य तुकडे करून ते कुकरमध्ये शिजवल्याचे तपासात उघड झाले आहे. सरस्वतीने विष पिऊन करून आत्महत्या केली आणि त्यानंतर आपण घाबरून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला, असा दावा मनोज साने याने पोलीस (Mira Raod Police) तपासात केला आहे. मात्र साने याने आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरस्वती माझ्या मुलीसारखी


आरोपी मनोजने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले की, तो दुर्धर आजाराने असून त्याचे सरस्वती सानेशी कधीही शारीरिक संबंध नव्हते. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, आरोपी मनोज सानेने पोलिसांना सांगितले की, सरस्वती वैद्य माझ्या  मुलीसारखी होती. आरोपी मनोज रमेश साने याने दावा केला की सरस्वती वैद्यने 3 जून रोजी आत्महत्या केली होती. आपल्यावर गुन्हा दाखल होईल या भीतीने मी तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. यानंतर मी माझे जीवन संपवण्याचाही कट रचला होता असे मनोजने पोलिसांना सांगितले.


गणित शिकवायचा साने


प्राथमिक चौकशीदरम्यान, साने याने पोलिसांना सांगितले की, "2008 मध्ये मी दुर्धर आजाराने ग्रस्त असल्याचे आढळून आले. तेव्हापासून मी औषधोपचार घेत होता. माझा एकदा अपघात झाला होता. त्याच उपचारादरम्यान संक्रमित रक्ताचा वापर केल्यामुळे मला हा आजार झाल्याचा संशय आहे. तसेच सरस्वतीला घरात स्वच्छता आणि नीटनेटकेपणा आवडायचा. त्यावरून आमच्याच भांडणे होत होती. ती दहावीच्या परीक्षेला बसण्याची तयारी करत होती आणि मी तिला गणित शिकवत होतो." दुसरीकडे पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सातव्या मजल्यावरील फ्लॅटच्या एका भिंतीवर एक बोर्ड होता, ज्यावर गणितीय समीकरणे लिहिलेली होती.


कोण आहे मनोज साने?


मनोज साने हा बोरिवलीचा राहणारा आहे. बाभई नाका येथे २००८ मध्ये ‘साने रेसिडेन्सी’ नावाची इमारत बांधण्यात आली. या इमारतीमध्ये साने याचे भाऊ राहतात. मनोजने मात्र घर भाड्याने दिले होते. यासोबत साने शिधावाटप केंद्र देखील चालवत होता. याच ठिकाणी त्याची ओळख सरस्वती वैद्यशी झाली होती. त्यांच्या ओळखीचे प्रेमात रूपांतर झाले. गेल्या आठ वर्षांपासून दोघे मीरा रोड येथे एकत्र राहत होते. मात्र हत्या झाली त्या घरात साने सरस्वतीसोबत गेली तीन वर्षे राहात होता.