मुंबई : सोशल मीडियावर (Social Media) दररोज काही न काही व्हायरल होत असतं. या व्हायरल पोस्टमध्ये (Viral) फोटो, व्हीडिओ, किंवा एखादी मेसेज असतो. कधी यामध्ये विनोद असतो, तर कधी सकारात्मक दृष्टीकोन देणारा व्हीडिओ. असाच एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. या फोटोला अनेक जणांनी शेअर केलंय. हॉटेल कामासाठी मराठी मुलं पाहिजेत, असा एक हॉटेलबाहेर लावलेला पोस्टर  व्हायरल होतोय. हॉटेलमालक नोकरीसाठी स्थानिक तरुणांना प्राधान्य देत असल्याने त्यांचं कौतुक होतंय. या पोस्टरबाबत नेटकऱ्यांकडून संमिश्र स्वरुपाच्या प्रतिक्रिया पहायला मिळत आहे. (misal hotel owner give job opportunitie to marathi boys photo viral on social media)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'स्व वऱ्हाडी मिसळ'कडून हॉटेलात कामासाठी मराठी मुलं पाहिजेत,  हा फोटो व्हायरल झालाय. या फोटो ठाण्यातील असल्याचा दावा केला जातोय. मात्र नक्की हा फोटो कुठला आहे, याबाबत नक्की माहिती नाही.


नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया


हा फोटो पाहून नेटकऱ्यांनी हॉटेलचालकाचं कौतुक केलंय. "हॉटेलमालकाने घेतलेला निर्णय योग्य आहे", असं एकाच म्हणंन आहे. तर "ते बाकी काही असो , मुलं कामाला मिळतील नाही मिळतील , तुम्ही एक पाऊल पुढे टाकून किमान प्रयत्न केला. तुमचे विचार आणि प्रयत्न आवडले दादा, प्रयत्नांती परमेश्वर, काम कामाचा गुरु", अशी कमेंटही एकाने केलीय. 



तर काहींनी याबाबत नकारात्मक कमेंट्स केल्या आहेत. "हॉटेल बंद पडेल पण ही मागणी पूर्ण होणार नाही. वीस वर्षांचा अनुभव आहे माझा", असं काहींचं मत आहे.