प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई : मुंबईत मियावाकी जंगलाच्या लागवडीला सुरुवात झाली आहे. महापालिका मुंबईत ६४ ठिकाणी जपानी जंगलपट्टे तयार करणार आहे. या जंगलपट्ट्याच्या निर्मितीसाठी बीएमसीने मोठा खर्च करण्याची तयारी सुरु केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई महापालिकेला सध्या जपानी जंगलाची भुरळ पडलीय. मुंबईत हरितपट्टे वाढवण्याचा एक भाग म्हणून जपानी पद्धतीनं जंगल लागवड केली जातेय. वडाळ्याच्या भक्तीपार्क परिसरात मियावाकी जंगलाचा पट्टा तयार करण्यात आलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या मियावाकी बागेचं उद्घाटन करण्यात आलं.



300 चौरस मीटर एवढ्या जागेत तब्बल 1 हजार रोपं लावली जाणार आहेत. मियावाकी जंगल लागवड दिसायला सोपी असली तरी झाडांची काळजी घेणं अतिशय खार्चिक आहे. एका झाडाच्या संवर्धनासाठी तब्बल 59 हजार रुपये खर्च येणार आहे. 


एवढी उठाठेव करण्यापेक्षा मुंबईतली झाडं तोडली जाऊ नयेत यासाठी सरकार आणि बीएमसीनं प्रयत्न केले तरी पुरेसे होतील. मुंबईच्या किनाऱ्यावरची खारफुटीही मुंबईच्या फुफ्फुसांचं काम करु शकते. पण त्यांच्या सवंर्धनाची कुणालाही पडलेली नाही. आता मियावाकी जंगल वाढणार की त्यावर ठेकेदार पोसला जाणार हे येत्या काळात स्पष्ट होईल.