वाहतूक कोंडी सुटणार? मेट्रो प्रकल्पासाठी व्यापलेला 84 किमी लांबीचा रस्ता वाहतुकीसाठी खुला
Mumbai Metro : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मान्सून दरम्यान रस्त्यावरील वाहतूककोंडी कमी करून नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Mumbai Metro project sites : मुंबईकरांची प्रवास सुखकर करण्यासाठी मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) ने मुंबईत सुमारे 14 मेट्रो मार्ग विकसित करण्याची योजना आखली आहे. या मेट्रोचे जाळे अपग्रेड झाल्यानंतर उपनगरीय रेल्वे मार्गावरील ताण कमी होऊन मुंबईकरांना सुखकर होण्यास मदत होईल. मात्र या मेट्रो प्रकल्पांमुळे नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते. याचपार्श्वभूमीवर मुंबई मेट्रोने रस्त्यावरील वाहतूककोंडी कमी करून नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
बॅरिकेड्स काढण्याचा निर्णय
मुंबई महानगर प्रदेशात निर्माणाधीन मेट्रो प्रकल्पातील उन्नत मार्गाचं काम जिथे जिथे झालं आहे तेथील बॅरिकेड्स काढण्याचा निर्णय घेतला आहे. 6 मेट्रो प्रकल्पातील एकुण 33, 922 बॅरिकेडस काढल्याने दुतर्फा 84.806 (४२ किमी एकेरी रस्ता) किमी. लांबीचा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्रदेशात सुमारे 337 किमी लांब मेट्रोचं जाळं प्राधिकरणामार्फत उभारण्यात येत आहे. त्यापैकी मेट्रो मार्ग 2ब, 4, 4अ, 5,6, 7अ आणि 9 या मेट्रो मार्गांसाठी लावण्यात आलेल्या बॅरिकेड्स पैकी सुमारे 60 टक्के बॅरिकेड्स हटवण्यात आले आहेत. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा प्रत्येकी 1-1 मार्गिका वाहतूकीसाठी सुरु करण्यात आली आहे.
वाचा: अनेक राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेल महाग, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
नागरीकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने एका विशिष्ट रुंदीचा भाग बॅरीकेड्स (धातुच्या पत्र्याचे अडथळे) लावून मेट्रोची कामे करण्यात येतात. पण तो प्रकल्प पुर्ण होईपर्यंत रस्ता अडवला जात असल्याने अनेकदा नागरीकांना मोठ्या वाहतुकीला कोंडीला सामोरं जावं जागतं. त्यावर उपाय म्हणुन प्राधिकरणाने हा निर्णय घेतला आहे. तसचे काही ठिकाणी बॅरिकेड्स ठेवणं अपरिहार्य होतं तिथे ते रस्त्याची कमीत कमी जागा व्यापतील अशा पद्धतीने लावण्याचा निर्णय घेतला गेला. ज्यामुळे अशा ठिकाणी 8 किमीहून लांबीचा अधिक रुंद रस्ता उपलब्ध झाला आहे. एकुण 3352 बॅरिकेड्स अशा पद्धतीने कमी कमी जागा व्यापतील असे पुनर्रचना करण्यात आले.
'या' मार्गांवरील बॅरिकेड्स काढण्यात आले
पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्ग, बीकेसी, . एस. व्हि.रोड, वी.एन. पुरव मार्ग(चेंबूर नाका),न्यू लिंक रोड, गुलमोहर रोड, , एम जी रोड, घोडबंदर रोड, कापूरबावडी, बाळकुम, दहिसर, मिरारोड, भाईंदर, ठाणे, तीन हात नाका, जेव्हिएलआर, इन्फिनिटी मॉल, पवई, कांजूरमार्ग, मानखुर्द या भागातील प्रगतीपथावर असलेल्या मेट्रो मार्गांवरील हे बॅरिकेड्स काढण्यात आले आहेत. ज्यामुळे प्रकल्पाच्या दोन्ही बाजूची 1-1 मार्गिका वाहतूकीसाठी मोकळी करून नागरिकांना अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे.