मुंबई : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर टीका करणारा काल, आज आणि उद्या असा बॅनर काल यांचे शिवसेना भवनासमोर लावण्यात आला होता. या बॅनरमधून काल मुस्लीम ( muslim ), आज हनुमान ( hanuman ), उद्या...? अशी टीका करण्यात आली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज ठाकरे यांनी ठाण्यात झालेल्या उत्तरसभेत मशीदीवरील भोंग्यावरुन इशारा दिला. 3 मेपूर्वी म्हणजेच ईदच्या आधी मशीदीवरील भोंगे उतरवले गेले पाहिजेत. तसं न झाल्यास हनुमान चालिसा वाजवली जाईल, हनुमान चालिसाने नाही झालं तर पुढचंही ठरलेलं आहे, माझ्या भात्यातला तो पुढचा बाण अजून मी काढलेला नाही, असा इशारा त्यांनी दिला होता. 


राज ठाकरे यांच्या याच भूमिकेवरुन मनसेला डिवचण्यात आलं. अज्ञात व्यक्तींनी शिवसेना भवनासमोर काल मुस्लिम, आज हनुमान आणि उद्या? अशा आशयाचे पोस्टर लावण्यात आले. या बॅनरला मनसे काय उत्तर देणार याकडे लक्ष लागलं असतानाच मनसेनं आज शिवसेना भवन ( Shivsena Bhavan ) समोर शिवसेनेच्या विरोधात 'काल, आज आणि उद्या' असा आशयाचा बॅनर लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो पोलिसांनी हाणून पाडला.


 



दादर मनसे शाखा अध्यक्ष संतोष माळी हे बॅनर लावण्याचा प्रयत्न करता असताना त्यांना पोलिसांनी अडवले. तसेच त्यांच्याकडील बॅनर जप्त केला. मनसेच्यावतीने लावण्यात येणाऱ्या या बॅनरवर 'काल'मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो दाखविण्यात आले.


'आज'मध्ये उद्धव ठाकरे (uddhav Thackeray), आदित्य ठाकरे ( aditya thackeray ) हे सोनिया गांधी ( soniya gandhi ) यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देताना तर त्याखाली उद्धव ठाकरे आणि शरद पवार ( sharad pawar ) यांचा असे दोन फोटो दाखविले आहेत. तर, 'उद्या'च्या ठिकाणी प्रश्नचिन्ह दाखवून शिवसेनेच्या बदलत्या भूमिकेवर प्रश्न निर्माण केलंय.