Raj Thackeray Live : राज ठाकरे यांनी आज मनसेचा (MNS) मेळावा घेतला. राज ठाकरे यांनी गटअध्यक्षांना संबोधित करताना मनसेने केलेल्या आंदोलनांची आठवण करुन दिली. यावेळी पुन्हा एकदा त्यांनी भोग्यांवरुन आक्रमक भूमिका घेतली आहे. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र सैनिकांना (Maharashtra Sainik) आक्रमक होण्याच्या सूचना दिल्या आहेत. (Raj thackeray aggressive again on mosque loudspeakers)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज ठाकरे यांनी म्हटलं की, 'महाराष्ट्रातील तमाम महाराष्ट्रसैनिकांनो. अजून काही ठिकाणी चरबी उतरलेली नाही. आधी पोलिसांकडे तक्रार करायची. त्यांनी जर अॅक्शन घेतली नाही. तर त्यांच्यावर न्यायालयाचा अपमान केल्याची केस होऊ शकते. तरी अॅक्शन घेतली नाही तर मोठ्या ट्रकवर स्पीकर लावून हनुमान चालिसा वाजवा. त्या शिवाय वटणीवर येणार नाहीत. जोपर्यंत आरे ला कारे होत नाही तोपर्यंत हे असंच राहणार. माझ्या सैनिकांकडून हीच अपेक्षा आहे. आरे आलं तर कारे झालंच पाहिजे.'


'गट अध्यक्ष म्हणजे एका बुथचा प्रमुख असतो. माझा गटअध्यक्ष आणि महाराष्ट्र सैनिक जेव्हा लोकांसोबत बोलतो तेव्हा तो राज ठाकरे असतो. कोरोनामुळे निवडणुका लांबणीवर गेल्या. मार्चमध्ये होतील असं वाटत होतं पण वातावरण तसं दिसतं नाही. फेब्रुवारी-मार्चमध्ये निवडणुका लागतील असं बोललं जातंय. पण तसं वातावरण तरी सध्या दिसत नाही. महाराष्ट्रात जो खंडोबा झालाय त्यामुळे काही होणार असा प्रश्न आहे.'


काही गोष्टी मुद्दाम सांगणं आवश्यक आहे. पक्ष स्थापन करुन 16-17 वर्ष झाली. या दरम्यान ज्या ज्या भूमिका घेतल्या, आंदोलन केलं त्याचा स्ट्राईक रेट पाहिला तर आपण सर्वात यशस्वी आंदोलन केली. टोलचं आंदोलन केलं त्यानंतर महाराष्ट्र सैनिकांनी राज्यभरात हे आंदोलन रेटलं. पण त्यानंतर 65 ते 67 टोलनाके बंद झाले. टोलनाके बंद करुन पण प्रश्न आम्हाला विचारतात. पण जे आंदोलन करत नाहीत त्यांना प्रश्न विचारत नाहीत.


रेल्वेचं आंदोलनाला उत्तर प्रदेश आणि बिहारच्या विरोधातलं आंदोलन असल्याचं म्हटलं गेलं. पण हे आंदोलन येथे नोकऱ्यांसाठी येणाऱ्य़ा लोकांच्या विरोधात आंदोलन होतं. मराठी लोकांना मात्र हे कळत नाहीत. महाराष्ट्रात नोकऱ्या आहेत पण आम्हाला माहित नाही. याबाबत विचारणा करताना जेव्हा एकाने आईवरुन शिवी दिली त्यानंतर हा हंगामा झाला. त्यानंतर हिंदी मीडियाने रान उठवलं. आजही उचक्या येतात त्यांनी. बाजुच्या राज्यात गुजरातमध्ये 2017-18 दरम्यान काँग्रेस आमदार कल्पेश ठाकूर यांनी एका मुलीवर बलात्कार झाल्यानंतर आंदोलन केलं. तेव्हा बिहार आणि युपीच्या लोकांना मारलं. तेव्हा 20 हजार उत्तर भारतीयांना हाकलून देण्यात आलं होतं. 2019 ला त्यालाच भाजपने उमेदवारी दिली.


मनसेने हे महाराष्ट्रातील तरुणांसाठी केलेलं आंदोलन होतं. हे देश फोडायचं आंदोलन नव्हतं. या भूमिका लोकांपर्यंत नीट जाणं महत्त्वाचं आहे. रजा अकादमीच्या आंदोलनात महिला पोलिसांवर हात टाकला. मीडियाच्या गाड्या जाळल्या. त्यांच्याविरोधात मोर्चा हा मनसेने काढला. परत असा मोर्चा काढण्याची हिंमत नाही झाली. फक्त हिंदुत्व करणारे तेव्हा कुठे होते. यांना काही देणं घेणं नाही.


उद्धव ठाकरेंवर टीका (Raj Thackeray on Uddhav Thackeray)


मुख्यमंत्री असताना तब्येतीचं कारण सांगितलं. पण एकनाथ शिंदे यांनी एका रात्रीत कांडी फिरवल्यानंतर फिरत आहेत. आता स्वार्थासाठी कोणाचे ही हात पकडायचे. असे धंदे मी नाही करत. फक्त पैशांसाठी भूमिका. उद्धव ठाकरे यांच्यावर एकतरी केस आहे का? पाकिस्तानच्या कलावंताना हाकलून दिले. तेव्हा कुठे होते हिंदुत्ववादी. मी आधीपासून हिंदुत्ववादी होतो. मराठी आणि कट्टर हिंदुत्ववादी घरात माझा जन्म झालाय.