मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेणार मोर्चेकरी शेतकऱ्यांची भेट
नाशिकहून मुंबईमध्ये हजारो शेतकरी दाखल झाले आहेत. हजारो शेतकरी पायी प्रवास करत मुंबईत दाखल झाले आहेत. विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा हा मोर्चा आहे.
मुंबई : नाशिकहून मुंबईमध्ये हजारो शेतकरी दाखल झाले आहेत. हजारो शेतकरी पायी प्रवास करत मुंबईत दाखल झाले आहेत. विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा हा मोर्चा आहे.
शनिवार उन्हामध्ये देखील हा मोर्चा मुंबईच्या दिशेने येत आहे. सोमवारी शेतकरी मंत्रालयाचा घेराव घालणार आहेत. या मोर्चाला शिवसेनेसह, काँग्रेस, मनसे यांनी देखील पांठिबा दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे देखील या मोर्चाला भेट देणार आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज संध्याकाळी ५ वाजता सोमैय्या ग्राउंडवर या मोर्चाला भेट देणार आहेत.