Raj Thackeray About USA Tour: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकत्याच केलेल्या अमेरिका दौऱ्यामध्ये प्रत्येक भारतीयला भेडसावणाऱ्या समस्येबद्दल भाष्य केलं. अमेरिकेत टॉयलेटमध्ये पाण्याऐवजी टॉयलेट पेपर वापरण्याची पद्धत आहे. याचसंदर्भात आपले अनुभव राज यांनी आपल्या खास शैलीत 'शब्दां वाचून कळले सारे' पद्धतीने जाहीर भाषणात सांगितले. राज ठाकरेंनी केलेल्या अनेक विधानांवरुन सभागृहातील पदाधिकाऱ्यांमध्ये एकच हशा पिकल्याचं चित्र मुंबईतील बैठकीमध्ये पाहायला मिळालं.


बाथरुममध्ये जेट स्प्रे पाहिल्यानंतर...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"पाण्यापासून टॉयलेटपेपरपर्यंत जायचं सोपं कामं सोप नाही. करुन बघा एकदा. मराठी म्हण आहे ना ज्याची जळते त्याला कळते ते तिथूनच आलं असेल. तो संपूर्ण परदेशातील प्रवास. काय हालत होतात ना सकाळच्या वेळेला ते आपले आपल्याच कळतं. तो प्रवास वगैरे करुन मी येणार होतो इथे मी लॉस एंजलीसमधल्या हॉटेलला आलो. मी तिथल्या हॉटेल रुममधल्या बाथरुममध्ये शिरल्यानंतर माझ्या ढुं**णे हंबरडा फोडा अगदी. त्या बाथरुममध्ये मी जेट स्प्रे पाहिले. आनंदाश्रू आवरेनात हो त्याला. तुम्हाला माहिती नाही त्याची मजा काय असते ते," असं राज यांनी म्हणताच सभागृहात एकच हस्यकल्लोळ माजला.


त्यांच्याकडे एवढं पाणी असून...


पुढे याच गोष्टीचा संदर्भ अमेरिकेतील व्यवस्था कशी वेगळी आहे आणि आपलं कुठे चुकतं यासंदर्भात भाष्य राज यांनी केलं. "ही सारी गोष्ट पाहताना मला असं लक्षात आलं. मी आधी नकाशामध्ये पाहिलं होतं त्याप्रमाणे कॅनडा आणि अमेरिका यांच्यामध्ये पाच तलाव आहेत. असंख्य तलाव आहे तसेच पण हे पाच तलाव अवकाशामधून दिसणाऱ्या गोष्टी आहेत त्यात येतात. त्या पाच तलावातला एक टींब दिसतो ना तेवढासा दिसतो नायगरा फॉल नकाशामध्ये फार आता आत (झूम करत) गेल्यास. जगातील एवढासा धबधबा दिसत पण नाही मॅपवर. इतके तलाव एवढ्या गोष्टी असून इतकं मुबलक पाणी असून कागदाने पुसतायत. दुसरीकडे आपण पाहा. इथे आमच्याकडे पाऊस कधी पडणार, धरणं भरली का. या वेळेला दुष्काळ पडेल असं असताना आम्ही धू धू धुतोय. माझं म्हणणं नाही की कागदावर जा. पण दरवेळेस याचं खापर ग्लोबल वॉर्मिंगवर फोटडो आपण," असं राज ठाकरे म्हणाले. 


नक्की वाचा >> 'लाडकी बहीण', 'लाडका भाऊ' एकत्र आले असते तर दोन्ही...', राज ठाकरेंचा टोला; शिंदे सरकारलाही चिमटा


आपण धर्माकडे पाहिलं पाहिजे...


"काही गोष्टी अशा आहेत की त्यावेळेला परंपरा म्हणून प्रथा पडल्या असतील. काही गोष्टींबदल बदल करण्याची गरज आहे. आपल्याकडे पाऊस पडत नाही. मराठवाड्यासंदर्भात एक रिपोर्ट आला होता. तिथे स्थिती अशीच राहिली तर 30 ते 40 वर्षात मराठवाड्याचा वाळवंट होईल. तर पुन्हा आता आहे तशी किंवा आधीसारखी परिस्थिती आणायची असेल तर साधारणपणे दिडशे ते 200 वर्ष लागतील. बेसुमार जंगलतोड सुरु आहे देशात. अनेक ठिकाणी हजारो एकर जमीनींवर जंगलतोड सुरु आहे. मी इथे आल्यावर काही गोष्टींचा विचार करत होतो. आपल्यातल्या काही गोष्टींकडे आपण वेगळ्या दृष्टीकोनातून पाहायला पाहिजे. दरवेळेला होळी आली की लाकडं जाळू नका सांगतो. मुळात आपल्याला पहिल्यांदा धर्माकडे पाहण्याचं गरजेचं आहे. आपल्या धर्मात हजारो लोक मरतात त्यांचे अत्यंस्कार लाकडावर होतात. सर्वाधिक लाकडांचा पुरवठा अंत्यस्कारासाठी होतो. देशात 0.1 टक्के विद्युत वाहिन्या नाहीत. आपण विचारसणी बदलायला हवी. ज्यांच्याकडे मुबलक जंगलं आहेत त्यांच्याकडे लोकांना खाली पुरत आहेत. आपल्याकडे लाकडं सगळ्यात जास्त जिथे वापरता त्यासंदर्भात राज्य आणि केंद्र सरकारने विचार केला पाहिजे," असं राज म्हणाले.


नक्की वाचा >> 'काहीही झालं तरी...'; थेट किती जागा लढणार सांगत राज ठाकरेंनी फुंकलं विधानसभेचं रणशिंग


अमेरिकेत भेटलेला मराठी हॉटेल व्यवसायिक


"गेले 20-25 दिवस परदेशामध्ये होतो. अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळाने मला तिथे बोलवलं होतं. माझी तिथे मुलाखत झाली. मला माहिती नाही तुम्ही पाहिला की नाही. परदेशातील मराठी बांधव-भगिनी मला भेटले. मी हॉटेलखाली उभा असताना एक मुलगा आला आणि त्याच्या डोळ्यात पाणी. आला माझ्या पाया पडला म्हणाला काहीही करा सर पण तुम्ही माझ्या रेस्तराँरंटला आलं पाहिजे. काहीही करुन तुम्ही आलं पाहिजे. बघतो वगैरे नाही आलं पाहिजे. शिवलकर नाव होतं त्याचं. मला म्हणाला. लहानपणी तुमची भाषणं ऐकून प्रेरणा घेऊन रेस्तराँ सुरु केली. मी त्याला म्हटलं, मराठी मुलांना व्यवसाय करा सांगितलं देश सोडा सांगितलं नव्हतं. मी गेलो तिथे तेव्हा थक्क झालो. 100 जण बसायची सोय होती हॉटेलमध्ये. बाहेर 50 जण बसण्याची सोय होती. दीड ते 2 तासांचं वेटींग होतं त्याच्या हॉटेलबाहेर. एवढी लोकं पाहून बरं वाटतं. आपआपलं अस्तित्व निर्माण करत असल्याचं पाहून बरं वाटलं," असं राज ठाकरे म्हणाले.