मुंबई : रस्त्यावर आम्ही काय करायचे हे नाना पाटेकरांनी आम्हाला शिकवू नये. तसेच, माहित नसलेल्या नको त्या गोष्टीत पाटेकरांनी लूडबूड करू नये. सगळ्याच गोष्टी या सरकारला सांगूण होत नसतात. परंतु, आम्ही ते देखील केले होते. पण, त्यात यश आले नाही, असे सांगतानाच. सर्वच गोष्ट सरकारला सांगून होतात. तर, मग नानांनी स्वत:ची संस्था कशाला सुरू केली. मराठी कलाकार म्हणून आम्हाला तुमचे कौतूक आहे. पण, तुम्हाला त्या परप्रांतिय फेरिवाल्यांचा पुळका का येतोय, असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फेरिवाल्यांविरूद्धच्या आंदोलनानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई येथे आज (शनिवार) कार्यकर्ता मेळावा घेतला. या मेळाव्यात राज ठाकरे यांन अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. या वेळी त्यांच्या भाषणात फेरिवाल्यांसोबतच कॉंग्रेस नेते संजय निरूपम, अभिनेता नाना पाटेकरही होते. आपल्या भाषणात नाना पाटेकरांवर राज यांनी तीव्र शब्दात टीका केली. महात्मा नाना पाटेकर असा खोचक उल्लेख करत राज ठाकरे म्हणाले, नाना पाटेकर हे अलिकडे सतत ८० वर्षांच्या म्हाताऱ्याच्या भूमिकेत वावरत असतात. ते सतत हा ही चांगला, तो ही चांगला, असे सांगत फिरतात. खरे तर, ते सैदव परग्रहातून आल्यासारखे वरून पाहतात. त्यांना वास्तवातील स्थिती माहित नसले. त्यामुळे त्यांनी नको त्या विषयात चोंबडेपणा करणे बंद करावे. तुम्ही मराठी अभिनेते अहात. आम्हाला कौतूक आहे. पण, तुम्हाला नको त्या विषयात बोलायला कोण सांगते. मराठी चित्रपटांना थिएटर मिळावे यासाठी नाना पाटेकर बोलल्याचे कधी ऐकीवात नाही. मग, या परप्रांतियांबद्दल तुम्हाला इतका पुळका कशासाठी, असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला. दरम्यान, नाना पाटेकरांच्या वेलकम या चित्रपटातील एका भूमिकेवरून उपहासात्मक उल्लेख करत कॉंग्रेस नेते संजय निरूपम हे नाना पाटेकरांचे अभिनंदन करतात, याबाबत ठाकरे यांनी संतापही व्यक्त केला.


राज ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे


- आमच्या मुख्यमंत्र्यांमध्ये मातृभाषेसाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसारखी हिम्मत नाही - राज ठाकरे
-  परप्रांतियांना जागा देऊन आपण मुंबईची जमीन गमावतोय - राज ठाकरे
- कोणताही इतिहास हा भूगोलाशिवाय नसतो - राज ठाकरे
-  झोपपट्यांत केवळ परप्रांतीयच नाहीत. तिथे मोहोल्ले उभा राहतायत. ते पुढे देशाच्या, राज्याच्या अंगावर येऊ शकतात. पण, अशा वेळी माझ्यासह, माजा मनसेसैनिक उभा राहिन - राज ठाकरे
-  मनसे कार्यकर्ते फेरिवाल्यांवर लक्ष ठेवणार -  राज ठाकरे
- राज्यात चोऱ्यांचे प्रमाण वाढलेय - राज ठाकरे
- अनधिकृत झोपड्यांना आगी लाऊन तिथे पक्की घरे बांधण्याचा डाव - राज ठाकरे
- सरकारी अधिकाऱ्यांनी न्यायालयाचा आदेश पाळावा. अन्यथा या अधिकाऱ्यांवर न्यायालयाच्या अवमान प्रकरणी खटले दाखल करणार - राज ठाकरे
- कोर्टाचा आदेश घेऊन मनसेचे सर्व पदाधि्कारी - रेल्वे, पोलीस आदी ठिकाणी पहोचवणार - राज ठाकरे
-  कोर्टाने दिलेल्या निर्णयाबद्धल कोर्टाचं अभिनंदन - राज ठाकरे
- आपला मामला सरळठोक जेव्हा वेडं वाकडं दिसतं तेव्हा, हाणणार. चांगलं करा कौतूक करणार - राज ठाकरे
- : फेरिवाला दिवसाला १०० रूपयांचा हप्ता भरू शकतो. पण, नोकरी करणारा मराठी माणूस ते करू शकत नाही - राज ठाकरे


-  महाराष्ट्रामध्ये फेरेिवाल्यांच्या मुद्द्यावर आमचंच कुंपण खातंय - राज ठाकरे