मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात एसटी कामगारांचा संप सुरु आहे. एसटी संपावर अजूनही तोडगा निघालेला नाही, या पार्श्वभूमीवर काल एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्ठमंडळाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. यावेळी कर्मचाऱ्यांनी आपले प्रश्न राज ठाकरे यांच्यासमोर मांडले. 


आज संध्याकाळी भेट घेणार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एसटी कामगारांच्या प्रश्नी लक्ष घालतो, असे राज ठाकरे यांनी एसटी कर्मचारी आणि कामगारांना आश्वासन दिले. त्यानंतर आज राज ठाकरे आज संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. आज संध्याकाळी राज ठाके सिल्व्हर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी ही भेट होणार आहे. एसटी कामगारांचा संप आणि त्यांच्या मागण्या या विषयी राज ठाकरे शरद पवार यांच्याशी चर्चा करणार आहेत.


राज ठाकरे यांचं आवाहन


संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली होती. राज यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येवर नाराजी व्यक्त केली होती. आत्महत्या हा पर्याय नाही. मी आत्महत्या करणाऱ्या लोकांचे मी नेतृत्व करत नाही, असं राज ठाकरे म्हणाले.


एसटी कामगारांच्या प्रश्नी लक्ष घालतो, असे राज ठाकरे यांनी एसटी कर्मचारी आणि कामगारांना आश्वासन दिले. त्यावेळी नाराजीही व्यक्त केली. यावेळी एसटीच्या कर्मचारी शिष्टमंडळाने राज्यशासनात विलीनीकरण व्हावे यासाठी आपण प्रयत्न करावे, अशी विनंती राज ठाकरे यांना केली. एसटीच्या विलीनीकरणाबाबत अनेक वर्षांचा आमचा लढा आहे. हा प्रश्न मार्गी लागल्यास आमचे प्रश्न सुटतील, अशी व्यथा एसटी कर्मचाऱ्यांनी राज ठाकरे यांच्या पुढे मांडली.