सर्वसामांन्यांच्या लोकल प्रवासासाठी मनसेचं `इंजीन` उच्च न्यायालयात
सध्या फक्त शासकीय आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल रेल्वे (Mumbai Suburban Railway) प्रवासाची परवानगी आहे.
मुंबई : कोरोनाच्या (Corona Virus) पहिल्या लाटेपासून काही महिन्यांचा अपवाद वगळता सर्वसामांन्यांसाठी लोकल रेल्वे (Mumbai Suburban Railway) प्रवास हा बंदच आहे. सध्या फक्त शासकीय आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल रेल्वे प्रवासाची परवानगी आहे. सर्वसामांन्यासाठी लोकल बंद असल्याने अनेकांचे हाल होत आहेत. रेल्वे पर्याय नसल्याने अनेकांना नोकरीवर पाणी सोडावे लागले आहे. तर अजूनही काही जोखीम घेऊन अनिधृकतरित्या प्रवास करत आहे. आता सर्वसामान्यांसाठी लोकल रेल्वे सुरु करावी, या मागणीवरुन मनसे (Maharashtra Navnirman Sena) आक्रमक झाली आहे. मनसेने यासाठी थेट उच्च न्यायालयाचे (High Court) दार ठोठावले आहे. मनसेने रेल्वे प्रवासासाठी न्यायालयाच याचिका दाखल केली आहे. याबाबतची माहिती मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे (Mns Sandip Deshpande) यांनी ट्विटद्वारे दिली आहे. (MNS general secretary Sandeep Deshpande and akhil chitre files a petition in High Court seeking permission to travel by local train)
ट्विटमध्ये काय म्हटलंय?
"ज्यांचे लसीचे दोन्ही डोस झाले आहेत त्यांना लोकल प्रवासाची परवानगी मिळावी, यासाठी मी आणि अखिल चित्रे उच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे", असं संदीप देशपांडेनी ट्विटमध्ये म्हटलंय. तसेच या ट्विटसह संदीप देशपांडे यांनी या अंतरिम याचिकेचा क्रमांकही दिलाय. १७०५० असा या अंतरिम याचिकेचा क्रमांक आहे. दरम्यान आता उच्च न्यायालय या याचिकेवर काय निकाल देतंय, याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.