कोरोनामुळे मनसेचा गुढीपाडवा मेळावा रद्द
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शिवतीर्थावर होणारा मेळावा रद्द
मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शिवतीर्थावर होणारा मेळावा रद्द करण्यात आला आहे. मनसेतर्फे यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. मनसेच्या मेळाव्याला मोठ्या संख्येने गर्दी होते. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
येणारी निवडणूक ६ महिने पुढे ढकलावी अशी मागणी देखील मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.
कोरोनाची जगात दहशत दिसून येत आहे. जगात लाखो लोक या साथीच्या आजाराने त्रस्त आहेत. तर ४००० पेक्षा जास्त लोकांचा आतार्पंयत मृत्यू झाला आहे.
देशातही ८०च्या घरात बाधा झालेल्यांची संख्या गेली असून दोघांचा मृत्यू झाला आहे. तर महाराष्ट्रातही २० जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय घेण्याचे आवाहन आरोग्या विभाग आणि राज्य सरकारने केले आहे.