मुंबई : यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट आहे. प्रत्येक जण योग्य ती काळजी घेत उत्सव साजरा करावा असं सांगत आहे. असं असताना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नागरिकांसाठी नवा उपक्रम राबवला आहे. 'आम्ही आणू बाप्पा तुमच्या घरी' असं म्हणतं यंदा मनसैनिक तुमच्या घरी बाप्पा घेऊन येणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या वर्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, माहीम विधानसभेतर्फे ‘आम्ही आणू बाप्पा तुमच्या घरी’ हा अभिनव उपक्रम राबवत आहेत. या उपक्रमांतर्गंत गर्दी टाळण्यासाठी महत्वाची भूमिका घेतली जात आहे. गणपती बाप्पाला घरी आणण्यासाठी कारखान्यातून बाप्पाची मूर्ती आणली जाते. यावेळी कारखान्यात गर्दी होते ही गर्दी टाळण्यासाठी मनसैनिक तुमचा बाप्पा तुम्हाला घरी आणून देणार आहेत. 



एकाच व्यक्तीला गणरायाची मू्र्ती आणण्यासाठी जावं लागणार आहे. तसेच ज्येष्ठ व्यक्तींना घराबाहेर पडणंही कठीण होणार आहे. तसंच या दिवसांत टॅक्सी उपलब्ध होणं देखील शक्य नाही. अशा परिस्थितीत मनसेने हा नवा उपक्रम राबविला आहे. नितीन सरदेसाई यांनी याबाबत माहिती दिली आहे. माहित ते प्रभादेवी या परिसरातील नागरिकांना या उपक्रमाचा लाभ घेता येणार आहे. लवकरच मनसे यासंदर्भात  संपर्क क्रमांक देणार आहे. त्या नागरिकांना त्यांचा बाप्पा कारखाना ते घरपोच आणून दिला जाणार आहे. 


गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मनसेनं विशेष बस सेवा सुरु केली आहे. शनिवारपासून या बस सेवेला प्रारंभ झाला असून दादरमधून ही पहिली बस कोकणसाठी रवाना झाली. मनसे आणि महापालिका कामगार-कर्मचारी सेनेच्यावतीनं हा उपक्रम राबवण्यात आला आहे. या बस सेवेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. 


मुंबईतील चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी कोकणात जाता यावे म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बस सेवा उपलब्ध केली होती, या...

Posted by Sandeep Deshpande Adhikrut on Saturday, August 8, 2020

“गणेशोत्सवानिमित्त लोकांना कोकणात सोडण्याची जबाबदारी खरंतरं राज्य सरकारची होती. त्यांनी ती योग्य पद्धतीनं पार न पाडल्यामुळं लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संभम्र होता आणि नाराजी देखील होती. त्यामुळे मनसेनंच हा पुढाकार घेऊन उपक्रम राबवला आहे. शहरातील विविध भागांतून अशा बस कोकणासाठी सोडण्यात येणार आहेत,” अशी माहिती मनसे नेते माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी दिली.