मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या हस्ते काल घाटकोपर येथील मनसे (MNS) कार्यालयाचं उद्घाटनाचा कार्यक्रम होता. यानिमित्ताने घाटकोपरमध्ये राज ठाकरे यांचे पोस्टर्स लावण्यात आले होते. ज्यावर राज ठाकरे यांचा 'हिंदुहृदयसम्राट' असा उल्लेख करण्यात आला होता. पण आता या पोस्टरबाजीवर पक्षाने नवं फर्मान काढलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनसेने हिंदुत्ववादी भूमिका घेतली आहे. त्यानंतर दोन वर्षांपूर्वी मनसेने झेंडा बदलला. याआधी राज ठाकरे यांचा मराठी हृदटसम्राट असा उल्लेख केला जात होता. त्यावेळी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना खडसावलं होतं. त्यानंतर काल त्यांचा हिंदुहृदयसम्राट असा उल्लेख केल्यानंतर ही पक्षाकडून अशी कोणतीही उपाधी लावू नये अशा सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आल्या आहेत.


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नावापुढे सध्या प्रचलित असलेल्या उपाधी व्यतिरिक्त (मराठी हृदयसम्राट) इतर नवीन कोणतीही उपाधी लावण्याचा उद्योग करू नये. या सूचनेचे तंतोतंत पालन व्हावे. अशा सूचना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या, राजगड मध्यवर्ती कार्यालयातून पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना आज देण्यात आल्या आहेत.