मुंबई : राज्यात सत्तानाट्यानंतर अखेर नव सरकार आलं. एकनाथ शिंदेंनी (Cm Eknath Shinde) मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच अनेक निर्णयांचा धडाका लावला.  मुख्यमंत्र्यांनी पहिल्याच बैठकीत आरेतच मेट्रो 3 चं कारशेड (Metro 3 Car Shed) होणार असल्याचं सांगितंल. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचा अनेक पर्यावरण प्रेमींनी निषेध केला. या निर्णयाविरोधात रविवारी आरेत 'सेव्ह आरे फोरेस्ट' (Save Aarey Forest) करण्यात येणार आहे. आता पर्यावरण प्रेमींनंतर मुख्यमंत्र्यांच्या आरेमधील कारशेडविरोधात राजकीय पक्षांनीही आपली भूमिका मांडली आहे. मनसेने आरेमध्ये कारशेड करण्याच्या निर्णयाचा विरोध केला आहे. (mns leader amit thackeray opposes to decision about metro 3 car shed in aarey aap will agitation 3 july at picinic spot)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेट्रो कारशेड आरेतच करण्याचा नव्या सरकारचा निर्णय हा धक्कादायक असल्याचं मनसे नेते अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच अमित ठाकरे यांनी या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी आग्रहाची विनंतही केली आहे. अमित यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत पक्षाची बाजू मांडली आहे.


अमित ठाकरे यांची फेसबूक पोस्ट


मेट्रो कारशेड आरे जंगलातच करण्याचा नव्या सरकारने घेतलेला निर्णय माझ्यासारख्या असंख्य पर्यावरणप्रेमींसाठी धक्कादायक आहे. आरेमध्ये कारशेड होऊ नये म्हणून शेकडो तरुण-तरुणींनी संघर्ष केला होता. काहींना तर पोलिसांनी गजाआड टाकलं होतं.


आपल्याला विकास हवाच आहे, पण पर्यावरणाचा बळी देऊन नको. आपलं पर्यावरण उद्ध्वस्त झालं तर भविष्यात राजकारण करायला माणूस नावाचा प्राणी शिल्लकच राहणार नाही, याचं भान सर्व राजकीय नेत्यांनी बाळगायला हवं. नवे मुख्यमंत्री आणि नवे उपमुख्यमंत्री यांनी आरेतील मेट्रो कारशेडबाबतच्या आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, ही आग्रहाची विनंती.


आपचंही आंदोलन


आपकडून मुख्यमंत्र्यांच्या आरेतील कारशेडच्या निर्णयाला विरोध दर्शवण्यात आला आहे. आपकडून या निर्णयाविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. आप मुंबई अध्यक्षा आणि राष्ट्रीय कार्यकारिणी  सदस्या प्रीती शर्मा मेनन यांच्या नेतृत्वात हे आरेत पिकनिक पॉइंट इथे हे आंदोलन करण्यात येणार आहे.


आपकडून आरे जंगल वाचवण्यासाठी हनुमान चालिसा पठण करण्यात येणार आहे. तसंच पवनपुत्र हनुमानाला प्रार्थना करण्यात येणार आहे. आपने ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली आहे.