COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : मुंबईत मालाड रेल्वे स्टेशनबाहेर मनसे कार्यकर्ते आणि फेरिवाले भिडले होते. यावेळी मनसे विभागध्यक्ष माळवदेंना मारहाण झालेला व्हिडिओ समोर आला आहे. 


शनिवारी मालाड येथे फेरीवाल्यांसमोर कॉंग्रेस नेते संजय निरुपम यांचे भाषण झाले.मनसेचे फेरीवाल्यांविरुद्ध आंदोलन सुरुच आहे. पण गेल्या शनिवारी याचे हिंसक पडसाद पाहायला मिळाले.


 मालाड परिसरात फेरीवाले बसले आहेत का याची पाहणी करण्यासाठी मनसे कार्यकर्ते पाहणी करत होते. 

 दरम्यान माळवदेंच्या डोक्यावर बांबूने जोरदार प्रहार केलेला या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. याप्रकरणी मालाड पोलिसांनी सात फेरिवाल्यांविरुद्ध तक्रार दाखल करुन घेतली होती.