नवी मुंबई विमानतळाच्या वादात राज ठाकरेंची उडी, पाहा काय म्हणाले राज ठाकरे?
नवी मुंबई विमानतळाला कुणाचं नाव असावं? राज ठाकरेंनी अखेर सोडलं मौन
मुंबई: नवी मुंबई विमानतळाला कोणाचं नाव द्यायचं यावर सध्या मोठा वाद सुरू आहे. दि. बा पाटील यांचे नाव देण्याची मागणी जुनी असली तरी त्यावरून आता पुन्हा एकदा वाद सुरू झाला आहे. या वादामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उडी घेतली आहे.
नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणासाठी आता मनसे सिडकोमध्ये आंदोलन करणार आहे. राज ठाकरे यांनी या वादात उडी घेतली असून नवी मुंबईला छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव देण्याची मागणी केली.
राज ठाकरे म्हणाले की, 'नाव काय द्यायचं हे केंद्र सरकार ठरवतं. नवी मुंबई विमानतळ हे मुंबई विमानतळाचं एक्सटेन्शन आहे. त्यामुळे त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्या', अशी मागणी केली आहे. नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव देण्याची मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.
बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनीच विमानतळाला शिवाजी महाराजांचं नाव दिलं असतं असंही राज ठाकरे सांगायला विसले नाहीत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवी मुंबई विमानतळाला काय नाव द्यायचं याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.