मनसे नेत्यांची राज ठाकरे यांच्यासोबत कृष्णकुंजवर बैठक
मनसेचे प्रमुख पदाधिकारी आणि नेते यांची कृष्णकुंज येथे बैठक
मुंबई : मनसेची आज पुन्हा बैठक होते आहे. मनसेचे प्रमुख पदाधिकारी आणि नेते यांची कृष्णकुंज येथे मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सोबत बैठक होत आहे. ९ जानेवारीला आझाद मैदानावर पाकिस्तान आणि बांग्लादेशी घुसखोरांच्या विरोधात मनसेचा मोर्चा आहे. याबाबत ही बैठक होत आहे. काल याच मुद्द्यावर रंगशारदा सभागृह वांद्रे येथे मनसेची बैठक पार पडली होती. मात्र मनसे पदाधिकारी यांच्या मनात एनआरसी, सीएएला पाठिंबा देण्यावरून अनेक प्रश्न आहेत. याच मुद्द्याला घेऊन शंकाच निरसन करण्यासाठी मनसेच प्रमुख पदाधिकारी आणि नेते यांची कृष्णकुंज येथे बैठक होत आहे.
सोमवारी झालेल्या बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना काही महत्त्वाच्या सूचना केल्या. राज ठाकरे यांनी, 'मला हिंदूहृदयसम्राट म्हणू नका. हा मान फक्त बाळासाहेबांचा असल्याची, सूचना केली आहे. २३ जानेवारीच्या राज्यव्यापी अधिवेशनानंतर मनसेची ही पहिलीच बैठक होती.
९ फेब्रुवारीला मनसेचा आझाद मैदानात मोर्चा आहे. या मोर्चाचं आयोजन करण्यासाठी या बैठका सुरु आहेत. मोर्चाबाबत रणनीती ठरवण्यासाठी मनसेचे नेते राज ठाकरे यांच्यासोबत बैठकीत सहभागी झाले आहेत. शॅडो कॅबिनेटबाबतही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. लवकरच शॅडो कॅबिनेट जाहीर होणार असल्याचं बाळा नांदगावकर यांनी म्हटलं होतं. महाराष्ट्राच्या राजकारणात नवा विचार आणि नवा ध्वज घेत मनसेने नवी सुरुवात केली आहे.