पोस्टरमधून शिवसेनेला मनसेचं आव्हान
मातोश्रीबाहेर मनसेची पोस्टरबाजी
मुंबई : मुंबईतल्या वांद्रे पूर्व भागात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर मनसेनं पोस्टर लावले आहेत. देशातल्या घुसखोरांआधी वांद्र्यातले घुसखोर हलवा असं आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना देण्यात आलं आहे. गुरुवारी रात्री हे पोस्टर लावण्यात आले आहे. या पोस्टरबाजीमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
या फलकावर माननीय मुख्यमंत्री साहेब पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना हिंदुस्थानातून हाकलंलच पाहिजे, हिच आपली भूमिका असेल तर प्रथम आपल्याच वांद्र्यातील अंगणात घुसखोरांनी भरलेले मोहल्ले साफ करा असा मजकूर लिहिण्यात आलाय. त्यामुळे घुसखोरांवरून शिवसेना मनसेत वाद रंगण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री त्यांनी वांद्रे येथील अंगणातील पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांनी भरलेले मोहल्ले साफ करावेत. या अशा आशयाचे पोस्टर मनसे कार्यकर्त्यांनी गुरुवारी रात्री मुंबतील वांद्रे पूर्वेत मातोश्रीच्या बाहेर लावले. परिणाम वांद्रे परिसरात काही काळ तणावाचे पसरले होते.
पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना हिंदुस्तानातून हाकलंलच पाहिजे हीच भूमिका असेल तर प्रथम वांद्रातील अंगणात घुसखोरांनी भरलेले मोहल्ले आधी साफ करा अशा आशयाचे फलक मनसेचे उपाध्यक्ष अखिल चित्रे यांनी लावले आहेत.