मनसेच्या पत्रकार परिषदेत `गुप्तहेर ट्रॅप`?
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मनसेच्या पत्रकार परिषदेत पोलिसांचा गुप्तहेर ट्रॅप झाल्याचा दावा केला आहे.
मुंबई : मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मनसेच्या पत्रकार परिषदेत पोलिसांचा गुप्तहेर ट्रॅप झाल्याचा दावा केला आहे. मनसेची मुंबईत पत्रकार परिषद झाली, त्यात साध्या वेशात पोलीस कर्मचारी तेथे उपस्थित असल्याचं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. तसेच सरकार मनसेची हेरगिरी करत असल्याचा आरोपी देखील संदीप देशपांडे यांनी केला आहे. मनसेच्या पत्रकार परिषदेत हा पोलीस साध्या वेशात आढळल्यानंतर, त्याला विचारपूस करण्यात आली.
हे लोकशाही विरोधात - मनसेचा आरोप
तेव्हा त्यांनी ओळख लपवली असा आरोपी संदीप देशपांडे यांनी केला आहे. तसेच या पोलिसाचे नाव जाधव असून ते रेल्वे पोलिसांचे गुप्तहेर असल्याचं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. मनसेच्या पत्रकार परिषदेत तसेच राज ठाकरे यांच्या घराचे देखील पोलीस साध्या वेशात येऊन मोबाईलमध्ये शूट करतात असल्याचं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. हे लोकशाही विरोधात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.