मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली. यावेळी विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.  विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, प्रकाश आंबेडकर, जोगेंद्र कवाडे, विनय कोरे, महादेव जानकर ,  जयंत पाटील, राज ठाकरे, इम्तियाज जलील, अशोक ढवळे, कपिल पाटील, राजेंद्र गवई आदी नेते या कॉन्फरन्समध्ये सहभागी होते. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मास्क परिधान केले नसल्याने साऱ्यांचे लक्ष तिकडे गेले. यासंदर्भात त्यांना प्रश्न विचारण्यात आल्यावर त्यांनी खास स्वत:च्या शैली याचे उत्तर दिले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परप्रांतीय कामगारांची परत तपासणी केल्यशिवाय महाराष्ट्रात घेऊ नये, राज्य स्थलांतरित कायद्याखाली त्यांची नोंदणी करावी. जे कामगार गेले आहेत त्यांच्या ऐवजी त्या नोकऱ्या महाराष्ट्रातील तरुण तरुणींना रोजगार उपलब्ध करून द्या अशी सूचना यावेळी राज ठाकरे यांनी केली. 


परप्रांतीयांकडून पैसे न घेण्याच्या मागणी बाबत माणुसकी बाजूला ठेवली पाहिजे. या आधी मी भाषणात म्हटलं होतं की संकाटाच्या वेळी परराज्यातील लोक पहिले पळतील.



शाळा सुरू कशा करणार? ते पालकांपर्यंत पोहोचवणं, महापालिका, सरकारी कर्मचारी पोलीस , सफाई कर्मचारी यांच्याकडे लक्ष देणे गरचेच असल्याचे राज ठाकरे म्हणाले. 


दरम्यान मास्क का नाही घातला ? या प्रश्नाला राज ठाकरे यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले. सगळ्यांनी घेतला म्हणून नाही घातला असे ते म्हणाले.


लॉकडाऊनबाबत सरकारचा एक्झिट प्लान काय आहे? याबाबत १० ते १५ दिवस आधी लोकांना सांगायला हवं. शेतकरीबाबत, कर्जाच्या परत फेडीबाबत प्रश्न विचारले आहे त्याचा उत्तर सरकार देईल


आपल्याकडे पहिल्यापासून सगळ्या गोष्टींचा मेस झालाय. कोणत्याही गोष्टीचा ताळमेळ नाही. बाहेरच्या राज्यातील लोक सरकारी रुग्णालयात आणि इथली लोक खासगी रुग्णालयात अशी स्थिती आहे. या सगळ्या सूचना सरकारने गांभीर्याने घ्याव्याते असेही ते म्हणाले. 


जगातल्या आकड्यांपेक्षा भारताचा आकडा कमी आहे. जगात माणुसकीचा विचार नाही करत यंत्रणेचा विचार करतात. 25 तारखेला ईद असून लॉकडाऊन वाढवला नाही तर लोक रस्त्यावर येणार, पेशंट वाढणार याची जाणिव राज ठाकरे यांनी करुन दिली. 


एसआरपीएफ लावणं हे देखील आहे पण तेही काम करून थकले आहेत. त्यामुळे दुसरी तुकडी लावणं महत्वाचं असल्याचे ते म्हणाले.