मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे आणि त्यांचे कुटूंबीय श्वानप्रेमी म्हणून ओळखले जातात. राज ठाकरे यांच्यावर आज दुःखाचा डोंगर कोसळला आहे. राज ठाकरे यांच्या आवडत्या 'जेम्स' या ग्रेट डेन जातीच्या श्वानाचे निधन झाले आहे. राज ठाकरे कुटुंबियांकडे आता ही विविध प्रजातींची सहा पाळीव श्वान आहेत. यातील 'जेम्स' या श्वानाचं निधन झालं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


राज ठाकरे यांच्या घरी विविध प्रजातींची पाळीव श्वानी अनेक वर्षापासून आहेत. यातील राज ठाकरे यांच्या आवडत्या जेम्स या ग्रेट डेन जातीच्या श्वानाचे निधन झाले आहे.राज ठाकरे यांच्याकडे तीन ग्रेट डेन जातीचे कुत्रे होते यातील बॉण्ड आणि श्वान चे आधीच निधन झाले आहे आता 'जेम्स' या कुत्र्याचे निधन झाले आहे.



26 डिसेंबर 2018 रोजी राज ठाकरे यांच्या लाडक्या कुत्र्याचं निधन झालं होतं. साडेबारा वर्षांपासून राज ठाकरेंसोबत असलेल्या 'बॉण्ड'चं निधन झालं. राज ठाकरे यांनी स्वतः त्यावेळी बॉण्डला परळच्या स्मशानभूमीत अखेरचा निरोप दिला आहे. 



बॉण्ड याच कुत्र्याने राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांना चावा घेतला होता. यानंतर त्याची रवानगी राज ठाकरे यांच्या कर्जत फार्महाऊसवर करण्यात आली होती.