मुंबई : देशभरात कोरोना व्हायरसचे संक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. ३१ मे रोजी देशव्यापी लॉकडाऊनचा चौथा टप्पा संपला. १ जूनपासून अनलॉक १ देशात सुरू झाला आहे. केंद्राने मात्र राज्य सरकारला आपल्या पातळीवर पुढील निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्र शासनाकडून राज्याला जे आदेश देण्यात आले ते इंग्रजी भाषेत प्रकाशिष केले आहेत. यावरून मनसेकडून आक्षेप घेण्यात आला असून मनसेचे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांनी याबाबत ट्विट करून इंग्रजीला महाराष्ट्राची राजभाषा केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन केले आहे. 



इंग्रजीला महाराष्ट्राची 'राजभाषा' केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचं मनःपूर्वक अभिनंदन. शासनाच्या Mission Begin Again या आदेशाच्या शीर्षकाला 'पुनश्च हरी ओम' म्हटलं की १२ पानी आदेशाचा मराठीअनुवाद झाला, असं समजायचं का? मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हसुद्धा इंग्रजीतच करावं!, असं या ट्विटमध्ये म्हटलं आहे.


चौथ्या लॉकडाऊननंतर अनलॉक१ चं काय स्वरूप असणार हे जाणून घेण्यासाठी नागरिक उत्सुक होते. या आदेशाची वाट सगळेच पाहत होते. पण आदेश मात्र इंग्रजीतून काढण्यात आला. राज्यातील सामान्यांना मराठी भाषा कळते हे मुख्यमंत्र्यांना माहित नाही का? असा सवाल यातून विचारण्यात आले आहे.