मुंबई : कॉंग्रेस प्रदेश कार्यालयाची तोडफोड करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कॉंग्रेस कार्यालयाची ही तोडफोड मनसेने केल्याचे समोर आले आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी याबाबत ट्विट केले आहे. ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा भैय्या संजय निरुपमच्या कार्यालयावर सर्जिकल स्ट्राईक..’, असे ट्विट त्यांनी केले आहे. दरम्यान, कॉंग्रेस कार्यालयाच्या तोडफोडप्रकरणी मनसेच्या तीन कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत आधीच मनसे आणि कॉंग्रेस फेरीवाला प्रकरणावरून आमनेसामने आले असताना ही घटना घडली आहे. त्यामुळे या प्रकरणाला आणखी वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. आता हा वाद आणखी पेटणार असे चित्र आहे.


मनसे -कॉंग्रेस वाद


पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून ही तोडफोड नेमकी कोणी केली याचा तपास पोलीस करत आहेत. याआधी फेरीवाल्यांचा वादावरून कॉंग्रेसच्या काही कार्यकर्त्यांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाणही केली होती. 


‘मनसेच्या गुंडांनी मार खाल्ला’


फेरीवाला आणि मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा राडेबाजीला सुरुवात झाली होती. विक्रोळी येथे काँग्रेस समर्थकांनी मनसे कार्यकर्त्यांना रविवारी रात्री जबर मारहाण केली होती. यावर ‘मनसेच्या गुंडांनी मार खाल्ला असून, यापुढे त्यांनी गुंडगिरी सोडून द्यावी,’ अशा शब्दांत मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी मनसेला डिवचण्याचा प्रयत्न केला होता.