मुंबई : महानगर गॅसच्या कार्यालयात तक्रार घेऊन गेलेल्या महिलेला कर्मचाऱ्याने मारहाण केल्याने मनसेच्या महिलांनी कर्मचार्‍याला चांगलाच चोप दिला. घटनास्थळी वागळे पोलिसांनी महानगर गॅसच्या कर्मचार्‍याला आणि मनसेच्या महिलांना ताब्यात घेतले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

  ठाण्यात वर्तक नगर भागातील महानगर गॅस बाबत जाब विचारले असता व्यवस्थापकांनी उलट जाब देत महिलांना  मारहाण केली  आहे. 


  नेमके काय घडले ? 


वर्तक नगर भागातील श्रुती महाजन यांची तक्रार होती. सुनीता पणिकर आणि समीक्षा मार्कंडे या महिलांना ठाण्यातील नितीन कंपनी येथील महानगर गॅस या ठिकाणी केली मारहाण केली आहे. या हाणामारीत महिलांचे कपडे फाटले असल्याचा, कर्मचार्‍यांनी लाथा मारल्याचा दावा त्यांनी केला आहे.  या बाबत गॅस व्यवस्थानाच्या कर्मचाऱ्यांना महिलांनी मनसे स्टाईलने चोप दिला आहे.


वागळे पोलिसांची मध्यस्थी 


मनसे महिला कार्यकर्त्यांना आणि महानगर गॅस कर्मचाऱ्यांना ताब्यात वागळे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.