मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्या शिवतीर्थ (Shivtirth) या निवासस्थानाबाहेर आता मनसे कार्यकर्ते जमा होऊ लागले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण राज ठाकरे यांना अटक करण्यापूर्वी मनसे कार्यकर्त्यांचा सामना सरकारला करावा लागेल अशा प्रतिक्रिया मनसे कार्यकर्त्यांनी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज ठाकरे यांनी राज्य सरकारला 3 मेचा अल्टिमेटम दिला आहे. अन्यथा मस्जिद समोर हनुमान चालिका लावण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. एकदा होऊनच जाऊदे असा इशारा देखील त्यांनी औरंगाबदच्या सभेत दिला होता. त्यामुळे आता राज्यात तणावाचं वातावरण तयार झालं आहे.


दुसरीकडे राज ठाकरे यांना अटक झाली तर राज्यातील वातावरण आणखी बिघडण्याची शक्यता आहे. हे गृहविभागाला देखील माहित आहे. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांची याबाबत बैठक देखील सुरु आहे. 


राज ठाकरे यांच्यावर आता पोलीस काय कारवाई करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. 4 मे रोजी मनसे आक्रमक होणार की काही वेगळी भूमिका घेणार याबाबत ही राज्यातील जनतेला उत्सूकता आहे.