मुंबई : आता लवकरच मोबाईल स्कॅन करुन रेल्वेचं तिकीट मिळणार आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या दहा उपनगरीय रेल्वे स्थानकांत येत्या डिसेंबरपासून ही सेवा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना मोबाईलवरचा अल्फा न्युमरिक संदेश स्कॅन करताच, रेल्वे प्रवासाचं तिकीट मिळणार आहे. 


अशाप्रकारे स्मार्ट फोनवर काढलेल्या तिकीटाची छापील प्रत रेल्वे स्थानकात बसवण्यात येणा-या यंत्रावर अल्फा न्युमरिक संदेश स्कॅन करुन लगेचच घेता येईल. त्यामुळे तिकीटासाठी रांगेत उभं राहण्याचा वेळ वाचणार आहे.