मुंबई : खंडणीप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेला इक्बाल कासकर याने भाऊ दाऊद इब्राहिमबद्दल काही नवे खुलासे केले आहेत. डी कंपनी त्यांच्या गुन्हेगारी कारवाया करण्यासाठी कोणकोणत्या कोडवर्ड्सचा वापर करते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कासकरने पोलिसांना सांगितले की, दाऊद इब्राहिम आणि त्याचे हस्तक ‘मोदी’ आणि ‘दिल्ली’ या कोडचा वापर अनुक्रमे छोटा शकिल आणि कराचीसाठी करतात. 


तसेच आणखी एका रिपोर्टनुसार, ‘बडे’ या कोडचा वापर डी कंपनीचा मुखिया दाऊद इब्राहिमसाठी तर ‘डब्बा’ या कोडचा वापर ‘पोलीस व्हॅन’साठी केला जातो. कासकरनुसार, ‘एक डब्बा’ कोडचा वापर ‘एक पेटी’साठी केला जातो. याचा अर्थ एक लाख रूपये असा होतो. याचप्रकारे एका बॉक्सचा अर्थ ‘एक कोटी’ असा होतो. 


यासोबतच इक्बाल कासकरने सांगितले की, दाऊद आणि अनीस इब्राहिम पाकिस्तानात आहेत. हे लोक कागदपत्रांशिवाय दुबईला ये-जा करतात. जेणेकरून गुप्तचर संघटनांच्या नजरेतून वाचता येईल.  


त्याने हेही सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानात दाऊद इब्राहिमच्या सुरक्षेत ५० टक्के वाढ करण्यात आली आहे. इक्बाल कासकरने सांगितले की, २०१४ नंतर पाकिस्तानच्या आतच दाऊदने चार ठिकाणे बदलली आहेत. दाऊद आजही आपल्या परिवारासोबत जोडला गेला आहे.