मुंबई : भायखळ्याच्या राणीबागेतल्या मोल्टनं बर्थडेच्या दिवशी चक्क गटारी साजरी केली... मोल्ट म्हणजे राणीबागेत असलेला वयानं सर्वात लहान पेंग्विन... तो आज दोन वर्षांचा झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दक्षिण कोरीयाच्या सेऊलमधून आठ पेंग्विन मुंबईत आणण्यात आले होते. त्यापैकी एका पेंग्विनचा मृत्यू झाला. उरलेल्या सातपैकी हे सर्वात लहान आणि खोडकर शेंडेफळ.


डॉ. मधुमिता आणि त्यांच्या टीमनं मिस्टर मोल्टसाठी स्पेशल सेलिब्रेशनचं आयोजन केलं होतं. मोल्टला लाल रंगाचं खास टी शर्ट घालण्यात आलं. त्याच्यासाठी बोंबिल आणि मांदेली या माशांपासून खास केक बनवला होता. या फ्रोझन फिश आईस केकचा मोल्टनं फडशा फाडला आणि बर्थडे सोबत गटारीही साजरी केली.