मनी लाँड्रिंग प्रकरण : अनिल देशमुख यांचा जामीन फेटाळला
राज्याचे माजी गृहमंत्री देशमुख यांना दिलासा नाहीच
मुंबई : मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh ) यांचा जामीन अर्ज PMLA कोर्टाने फेटाळला आहे. माजी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांवर लावलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोप प्रकरणातील डिफॉल्ट जामीनासाठी देशमुखांनी अर्ज दाखल केला होता.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपानंतर अनिल देशमुख यांना 2 नोव्हेंबर रोजी ईडीनं केली. ते सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहेत. ईडीनं दाखल केलेल्या 5000 पानी पुरवणी आरोपपत्रानंतर देशमुखांतर्फे विशेष पीएमएलए कोर्टात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता.
आज Special PMLA कोर्टात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावतीने ज्येष्ठ कायदेतज्ञ विक्रम चौधरी, अनिकेत निकम यांनी युक्तीवाद केला. तर ईडीकडून ऍड श्रीराम शिरसाट यांनी युक्तीवाद केला.