मान्सून केरळ किनारपट्टीवर दाखल
हवामान खात्याच्या अंदाजानुसार केरळ किनाऱ्यावर यंदा नैरुत्य मौसमी पावसाचं ४८ तास आधीच आगमन झालं आहे.
मुंबई : संपूर्ण देशासाठी आनंदाच्या ही बातमी आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार केरळ किनाऱ्यावर यंदा नैरुत्य मौसमी पावसाचं ४८ तास आधीच आगमन झालं आहे.
केरळ किनारपट्टीवर आज मान्सून दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण असल्याचं हवामान खात्यानं कालच जाहीर केलं होतं. त्यानुसार आज सकाळी मान्सूनच्या आगमनाची बातमी हवामान खात्यानं दिली आहे.
मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्यास आणखी काही दिवसांचा अवकाश आहे. यावर्षी देशभरात उन्हाचं प्रमाण देखील जास्त होतं, यामुळे कधी मान्सून भारतात दाखल होणार याविषयी शेतकऱ्यांसह सर्वांना उत्सुकता होती.