मुंबई: मोराहून मुंबईकडे निघालेली लाँच गुरुवारी समुद्रात भरकटल्याची घटना घडली. या लाँचमध्ये 50 ते 60 प्रवासी होती. बुचर बेटाजवळ साधारण साडेसात वाजता हा प्रकार घडला. त्यामुळे बोटीतील प्रवासी भयभीत झाले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुमारे दीड तासाच्या प्रयत्नानंतर लाँचवरील कर्मचाऱ्यांनी इतर बोटींशी संपर्क साधण्यात यश मिळवला. त्यानंतर याठिकाणी लगेचच मदत करण्यासाठी दुसरी बोट पोहोचली.


बंद पडलेल्या लाँचमधून सर्वांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात आले. मात्र, तोपर्यंत प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता.