मुंबई : मुंबईत एका व्यावसायिकाने एका फ्लॅटसाठी तब्बल 120 कोटी रुपये मोजलेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गृहनिर्माण क्षेत्रातल्या तज्ज्ञांनुसार आतापर्यंतची ही सगळ्यात मोठी डील असून एखाद्या व्यक्तीने एका फ्लॅटसाठी पहिल्यांदाच इतके पैसे मोजलेत. या व्यावसायिकाचे नाव नीरज बजाज असं असून त्याने वरळीतील अॅनी बेझंट रोडवर असणा-या इमारतीत  पन्नासाव्या मजल्यावर 1587 चौ. मी.चा हा फ्लॅट खरेदी केलाय. बजाज यांना या महागड्या फ्लॅटसह 8 कार पार्किंगची जागाही मिळणार आहे.  याआधी 2017 साली व्यावसायिक देवेन मेहता यांनी पेडर रोड इथं लोधा अल्टामाउंटमधल्या एका फ्लॅटसाठी 57.45 कोटी रुपये मोजले होते. 


विराट कोहलीने रद्द केला आपला फ्लॅट 


भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली वरळीच्या ओंकार रिअल इस्टेटमधील नव्या घरात शिफ्ट होणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्याने २०१६मध्ये ओंकार रियल्टर्स अँड डेव्हलपर्सच्या रेसिडेंशियल प्रोजेक्ट ओंकार १९७३मध्ये ३४ कोटी रुपयांचा फ्लॅट घेतला होता. मात्र मिळालेल्या माहितीनुसार, विराटची ही डील रद्द झालीये. विराट मुंबईत आता भाड्याच्या घरात राहतोय.


सात हजार स्क्वे फूटाच्या फ्लॅटची डील २० मार्चला रद्द करण्यात आली. इकॉनॉमिक टाईम्सच्या बातमीनुसार, या घराचे काम अद्याप सुरु आहे. मात्र या दरम्यान विराटने हे घर खरेदी करण्याचा विचार बदलला. हा फ्लॅट ३५व्या मजल्यावर आहे. यासाठी विराटने चार गाड्यांसाठी पार्किंग एरियाही खरेदी केला होता. 


विराट पेंटहाऊसच्या शोधात


मीडिया रिपोर्ट आणि मार्केट सूत्रांच्या माहितीनुसार, विराट कोहली सध्या एका पेंटहाऊसच्या शोधात आहेत. कोहलीला हे पेंटहाऊस वांद्रे आणि वर्सोवा या दरम्यानच्या भागात हवेय.