मुंबई : lockdown in Mumbai  : BKC जम्बो COVID19 केंद्रात 2500 खाटा उपलब्ध आहेत. आतापर्यंत, केंद्रात एकही आयसीयू रुग्ण नाही. बहुतेक रुग्ण लक्षणे असलेले आहेत. मात्र,  कोरोनाची संख्या वाढत आहे. सध्या कोरोनाचे रुग्ण चारपट वाढत आहेत. पण कोणीही घाबरुन जाऊ नये. असे असले तरी वीकेंड लॉकडाऊन (Weekend lockdown) सध्या लागू होणार नाही, असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केले आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 मुंबईत वीकेंड लॉकडाउन लावणार का, यावर महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्टच सांगितले की, काळजी घेतली तर लॉकडाऊन दूर होऊ शकतो. विरोधकांनी संभ्रम निर्माण करु नये. मजुरांना विनंती आहे की मुंबई बाहेर जाऊ नये आणि नियमांचे पालन करावे. तसेच ज्यांचे लसीकरण झाले नसेल त्यांनी आपले लसीकरण पूर्ण करावे, असे आवाहन महापौर पेडणेकर यांनी केले. 



मुंबईत दररोज कोरोनाचे वीस हजार रुग्ण आढळून येत आहेत, त्यापैकी सतरा हजार रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आणि काहींमध्ये तर लक्षणेच नाहीत. सर्वात दिलासा देणारी बाब म्हणजे, यात कोणीही अतिदक्षता विभागामध्ये दाखल नाही. संकट काहीही असो, आम्ही घाबरत नाही. महापालिकेची पूर्ण तयारी आहे. सध्या तरी लॉकडाऊन लागू करण्यात येणार नाही. काळजी करु नका मात्र, काळजी घ्या, असे महापौर म्हणाल्या.