संतापलेल्या आईने कुऱ्हाडीने उडवले मुलाचे मुंडके
आई इतकी संतापली होती की, तिने मुलाचे शीर धडावेगळे केले.
वसई: अवधूत आश्रमाजवळील डोंगरीपाडा परिसरात संतापलेल्या आईने आपल्या तरूण मुलाची (वय वर्षे २७) कुऱ्हाडीने घाव घालून हत्या केली. आई इतकी संतापली होती की, तिने मुलाचे शीर धडावेगळे केले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी हजेरी लावत मुलाच मृतदेह ताब्यात घेतला आणि तपास सुरू केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाणविण्यात आला आहे. पोलिसांनी भा.दं. ३०२ अन्वये गुन्हा दाखल करत आरोपी आईला तब्यात घेतले आहे.
उत्तर भारतीय मुलीसोबत प्रेमविवाह
प्राप्त माहितीनुसार, पेल्हार फाटा, अवधूत आश्रमाच्या पाठिमागे असलेल्या डोंगरीपाडा गावात संतोष बालाराम कारेला (२७) हा आई-वडील, भाऊ आणि मुलासोबत राहात होता. चार वर्षापूर्वी त्याने एका उत्तर भारतीय मुलीसोबत प्रेम विवाह केला होता. त्याला दारूचे प्रचंड व्यसन होते. त्यामुळे दारू पिल्यावर तो कुटुंबीय आणि आजूबाजूच्या लोकांना शिवीगाळ आणि मारहाणही करत असे. त्याच्या या वर्तनाला घरचे लोक आणि शेजारीही वैतागले होते.
संतोषला दारूचे व्यसन
संतोषच्या नेहमीच्या त्रासाला कंटाळून त्याची पत्नी छोट्या मुलाला घेऊन आपल्या माहेरी धानिवबाग येथे राहात होती. सोमवारी रात्री८ वाजता संतोषची आई जया स्वयंपाक करत होती. दरम्यान, संतोष तिला दारूसाठी पैसै मागू लागला. पैसे देण्यास जयाने नकार देताच त्याने भांडण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर तो घरातून बाहेर गेला आणि रात्री साडेनऊ वाजनेच्या सुमारास परत घरी आला.
जागेवरच मृत्यू
दरम्यान, घरी परतलेल्य संतोषणे आईसोबत पुन्हा भांडण्यास सुरूवात केली. त्याने घरात असलेली कऱ्हाड उचलून आईला धमकवण्यास सुरूवात केली. या वेळी झालेल्या झटापटीत आई जयाने संतोषच्या हातातील कुऱ्हाड हसकाऊन घेतली. दरम्यान, नशेच्या अंमलाखाली असलेला संतोष तोल जाऊन जमीनीवर पडला. याच वेली संतापलेल्या जयाने राग अनावर होऊन संतोषच्या मानेवर कुऱ्हाडीने ६ घाव घातले. यात संतोषचा जागीच मृत्यू झाला. समतोषच्या वडिलांनी पत्नीविरोधात(जया) तक्रार दाखल केली आहे.